मंचर,आंबेगाव : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नाने निघोटवाडी (पांडवदरा) येथील तलावाच्या कामास जलसंधारण  महामंडळकडून १४ कोटी ८२ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी

427

     मंचर,आंबेगाव : (ब्युरो रिपोर्ट) – निघोटवाडी (ता.आंबेगाव ) येथील लघू पाटबंधारे तलावाच्या कामास जलसंधारण महामंडळकडून दि.११ सप्टेंबर २०१९रोजी १४ कोटी ८२ लाख ४५ हजार ३६४ रुपयांच्या कामास प्रशासकिय मान्यता मिळाली असल्याची माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
लघू पाटबंधारे तलाव निघोटवाडी (पांडवदरा )या तलावाच्या कामास जलसंधारण मंडळ यांचेकडून दा.१७ मे २०१२ रोजी ६ कोटु ८१ लाख १९ हजार २८८ एवढी रक्कम मंजुर करण्यात आली होती.परंतु १ एप्रिल २०१४ पुर्वी प्रशासकिय मान्यता दिलेल्या परंतु क्षेञिय कामे सुरु झाली नाहीत अशा सर्व योजनांची कामे जलसंधारण महामंडळाच्या दि.२४ सप्टेंबर २०१५ रोजीच्या ४९ व्या बैठकीमध्ये महामंडळाने रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.यामुळे या परिसरातील जनतेवर अन्याय होत असल्याची बाब विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली .विधानसभेमध्ये कपात सुचनेद्वारे हा प्रश्न उपस्थितीत करुन जलसंपदामंञी राम शिंदे यांना भेटून विनंती केली .त्यानुसार त्यांनी महाराष्ट् जलसंधारण महामंडळाने लघू पाटबंधारे तलाव निघोटवाडी (पांडवदरा )या तलावाच्या १४ कोटी ८२ लाख ४५ हजार ३६४ रुपयांची प्रशासकिय मान्यता दिली.
या योजनेमुळे ८५० स.घ.मि.पाणीसाठा निर्माण होऊन १९४ हेक्टर क्षेञ ओलिताखाली येणार असून  विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना येथील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता होवून त्याचा फायदा होणार आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *