टाकळी हाजी,शिरूर : शिरूरच्या तहसिलदारपदी लैला शेख यांनी पदभार स्विकारला,तालुक्यातील अवैध गौण खनिज तस्करी रोखण्यांचे मोठे आव्हान

3170

       टाकळी हाजी,शिरूर (प्रतिनिधी,संजय बारहाते) –  शिरूरचे तहसीलदार गुरु बिराजदार यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी लैला शेख यांनी शिरूर तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात अवैध गौण खनिज तस्करी सुरू असुन, त्या विरोधात धडाकेबाज कारवाई करणाऱ्या दोन तहसीलदारांना तीन वर्षात बदलीला सामोरे जावे लागले असल्याची दबक्या आवाजात चर्चा ऐकवायास मिळत आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या घोड, कुकडी, वेळ,भीमा या नद्या व त्याचबरोबर  त्याच बरोबर विविध गावातील शेतामधुन मोठया प्रमानात अवैध गौण खनिजांचा बेकायदेशीर उपसा करून त्या मधुन कोट्यावधिंची माया अनेकांनी कमवली असल्याची चर्चा होत आहे.व त्यातूनच अनेकांचे  दहशत माजविण्यांचे काम सुरू असल्याचे ही बोलले जात आहे. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांची बदली होऊन तेथे प्रविण खानापुरे यांची नियुक्ती झाली असून तहसिलदार गुरु बिराजदार यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर लैला शेख यांनी पदभार स्विकारला आहे.  तालुक्यामधील अवैध धंदया मधुन सुरू असलेली गुंडगिरी, चोऱ्या रोखण्यांचे आव्हान पोलिस खात्यासमोर आहे.
याबाबत तहसिलदार शेख म्हणाल्या की, तालुक्यामधील सामान्य जनतेला रेषन कार्ड, जात, उत्पन्न व इतर  दाखले, देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच प्रत्येक मंडल अधिकारी कार्यालयामधे तक्रार पेटी ठेवण्यात येईल. तालुक्यामधील अवैध वाळु, उपसा व वाहतुकीसाठी पथके तयार करुन कडक कारवाई केली जाईल असे सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *