४६६ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; पेरणे फाटा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

898

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचा स्त्युत्य उपक्रम 

शिक्रापूर, ता.शिरुर (– प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचा तर्फे सत्संग भवन पेरणे फाटा, ता.हवेली येथे सकाळी 8:00 ते  5:00  या वेळेत भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. यामध्ये ससून रुग्णालय, वाय.सी.एम.रुग्णालय या रक्तपेढीनी 466 युनिट रक्त संकलित केले. ” माणसाचे रक्त नाल्यामध्ये न वाहता ते माणसाच्या नसांमध्ये प्रवाहित वाहावे ” असा संदेश “संत निरंकारी मिशन चे चौथे सद्गुरू बाबा हरदेव सिंह जी महाराज” यांनी दिला होता, यातून प्रेरणा घेऊन ४६६ उत्साही रक्तदात्यांनी रक्तदान केले व ११०० लोकांनी आपली उपस्थिती दर्शिवली. या रक्तदान शिबिराचे उदघाटन ” ताराचंद कारामचंदानी (झोनल इन्चार्ज,पुणे झोन ३४) यांच्या शुभहस्ते झाले. या वेळेस संजय भिलारे (मुखी, पेरणे फाटा सत्संग), विक्रम पानसरे (संचालक, सेवादल  युनिट न. १०३८)”,जयराम सावंत (शिक्रापूर मुखी), सोमनाथ शिंदे (केंदूर मुखी),अंगद जाधव (सेक्टर संयोजक, भोसरी) यांनी आपली उपस्थिती दर्शवली.  या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक, राजकीय, शासकीय अधिकारी-पदाधिकारी यांनी आवर्जून आपली उपस्थिती दर्शवली. रक्तदान करणे हे मोलाचे योगदान आहे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. संपूर्ण पेरणे फाटा व पंचक्रोशीत चॅरिटेबल फौंडेशनच्या स्वयंसेवकानी घरोघरी जाऊन तसेच पटनाट्य, प्रभात फेरीद्वारे रक्तदान विषयी जनजागृती केली. पेरणे फाटा शाखेचे चे मुखी संजय भिलारे यांनी सर्व रक्तदात्यांचे, उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *