दोंडाईचात जिवा महाला यांची 384 वी जयंती साजरी

359
दोंडाईचा,धुळे : (प्रतिनिधी समाधान ठाकरे) – शहरातील दोंडाईचा नाभिक समाज हितवर्धक संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली जिवा शिवा विर भाई कोतवाल मंच यांच्या वतीने  दि. 09 रोजी शिवरत्न जिवा महाला यांची 384 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रविंद्र सैंदाणे यांच्या दुकानाजवळ सकाळी साडेनऊला कार्यक्रम संपन्न झाला.
 जिवा महाला यांच्या प्रतिमेला दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सैंदाणे व दोंडाईचा शहर नाभिक समाज अध्यक्ष देविदास चित्ते यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सैंदाणे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष रवींद्र चित्ते सर, दोंडाईचा शहराध्यक्ष चित्ते, दोंडाईचा दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष किरण सूर्यवंशी, उपाध्यक्ष महेंद्र चित्ते, जेष्ठ सल्लागार भावराव सैंदाणे, छोटू महाले, राजेंद्र चित्ते, शिवा वीर भाई कोतवाल मंचचे अध्यक्ष भूषण अहिरे, पत्रकार समाधान ठाकरे, अनिल ईशी योगेश मिस्त्री, मुकेश चित्ते, गुलाब पवार, सोनू पवार, वसंत निकम, योगेश सूर्यवंशी अर्जुन चित्ते अनिल आदी समाज बांधव उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *