विधानसभा निवडणूक २०१९ – प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या,मतदानाचा हक्क सर्वांनीच बजावणे महत्वाचे 

1047

    शिरूर,पुणे : (सुभाष शेटे) -गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या२०१९ च्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या  प्रचाराच्या तोफा आज शनिवारी दि. १९ ला रोजी सायंकाळी  थंडावल्या. राज्यात विधानसभेच्या २८८ मतदारसंघांत येत्या सोमवारी दि. २१ ला मतदान होणार आहे. भाजप, शिवसेना, मनसे,कॉँग्रेस,राष्ट्रवादी कॉँग्रेस, या प्रमुख पक्षांसह अनेक पक्षाचे उमेदवार यंदाच्या निवडणूक  रिंगणात आपले भाग्य अजमावत आहेत.उमेदवारांनी आज अखेरच्या दिवशी सभा, रॅली, रोड शो व  मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारसंघ पिंजून काढल्याचे चित्र पाहावयास मिळाले.राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी,आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्याचे व प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांनी आपला मतदार संघ पिंजून काढत मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचेही चित्र पाहावयास मिळाले. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावण्याचे आवाहन ही करण्यात आले.  तर आज शनिवारचा दिवस हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पक्षांच्या  नेते उमेदवार,कार्यकर्ते यांची मोठी धावपळ सुरु होती. आज सायंकाळी राज्यातील प्रचाराची रणधुमाळी थाबंल्याने आता सोमवारी होणाऱ्या मतदानाची उत्सुकता सर्वच मतदारातुन दिसून येत आहे.

मतदानाची सर्व तयारी राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे.मतदान नि:पक्षपाती व खुल्या वातावरणात होण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.तर मतदानानंतर दोनच दिवसांनी म्हणजे येत्या २४ तारखेला मतमोजणी होणार असल्याने निवडणूक निकालाची उत्कंठा अधिकच लागणार आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *