दोन दुचाकी चोरांना १९ दुचाकीसह अटक,रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी  

647

 टाकळी हाजी,शिरूर : (प्रतिनिधी,संजय बारहाते) – शिरूर तालुक्यात मोटार सायकल चोरांनी मोठाच धुमाकुळ घातला होता. त्यातील दोन आरोपीना १९ दुचाकी गाडयासह पोलिसांनी गजाआड केल्याने जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिरूर तालुक्यामधे मोठया प्रमानात चोरीचे सत्र वाढले असुन त्यामधे मोटार सायकलीची चोरीची तक्रार तर नित्याचीच झाली आहे .पोलिसा पुढे मोटार सायकल चोरांचे आव्हान निर्माण झाले होते. पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी ही याबाबत मोटार सायकल चोरीवर प्रनिबध घालण्याचे आदेश जिल्हयामधील पोलिसांना दिले होते. एमआयडीसी रांजणगाव पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यानी जोरदार कामगिरी करीत शिरूर, शिक्रापुर पोलिस स्टेशन हददीमधील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
याबाबत उपविभागिय पोलिस अधिकारी सचिन बारी,रांजणगाव गणपती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी प्रफुल्ल कदम , पोलिस हवालदार तुषार पंधारे, अजित भुजबळ मंगेश थिगळे प्रफुल्ल भगत यांनी  मोलाची कामगिरी केली. या प्रकरणी शिरुर येथुन अनिल विठठ्ल वेताळ व आकाश बबन चित्तर या दोन तरुणांना अटक करून १९ दुचाकी गाडया ताब्यात घेतल्या आहेत . त्यामधे दहा लाख ६७ हजार रुपयये किमंतीची ह्या मोटार सायकली असुन ऐवढया मोठया प्रमानात तालुक्यात प्रथमचं गाडया सापडल्याने जनतेमधुन पोलिसाचे कौतुक होत आहे. याबाबत पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत म्हणाले की, नागरीकानी वाहने पार्कींग मध्ये तसेच सिसीटीव्हीच्या अंतर्गत लावावी .




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *