कांद्याला मिळाला उचांकी भाव,शिरूरच्या तांदळीतील शेतकरी मुक्ताजी गदादे यांना मिळाले २३ कांदा गोण्यांचे नेट एक लाख रुपये 

803
        तांदळी,शिरूर : (ब्युरो रिपोर्ट) – अवकाळी पावसाचा सर्वत्रच फटका बसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असताना शिरूर तालुक्यातील तांदळी येथील शेतकरी मुक्ताजी रघुनाथ गदादे यांनी जीवापाड सांभाळलेल्या कांद्याला चांगलाच भाव मिळाला आहे. सोलापूर कृषी बाजार समितीत त्यांनी विक्रीसाठी नेलेल्या चांगल्या प्रतीच्या जेमतेम २३ गोण्या कांद्याला खर्च वजा जाता चक्क एक लाख रुपये मिळालेत. अडचणीच्या काळात कांद्याला मिळालेल्या चांगल्या बाजारभावामुळे कुटुंबास बऱ्यापैकी आर्थिक हातभार मिळाल्याचे गदादे यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले.
       गदादे यांनी सोलापूर मार्केटला नेलेल्या मात्र २३ गोण्यातील चांगल्या प्रतीच्या कांद्याला ११० रुपये प्रतिकिलो असा उचांकी भाव मिळाला. एकूण १२३२ किलो कांद्याला सरासरी ८३ रुपये ३३ पैसे भाव मिळाला. त्यामुळे मुक्ताजी गदादे यांना जेमतेम २३ गोण्या कांद्याला खर्च वजा जाता चक्क एक लाख रुपये मिळालेत.कांदा जीवापाड संभाळल्याचे आत्यंतिक समाधान झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सोशल मीडियावर २०१९ मधील पाऊस,कांदा व राजकारण परत कधीही पहायला मिळणार नाही या मेसेज चा प्रत्यय गदादे यांच्या कांद्याची पट्टी पाहून आला आहे व आज शेतकरी ही कांद्याला मिळालेला भाव पाहून आचंबित होत असल्याची प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी मुक्ताजी आबा गदादे यांनी व्यक्त केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *