मुरबाड मध्ये घरफोडी,चोरीच्या घटनेत वाढ  

488
     मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड शहरात चोरीच्या व घरफोडीच्या घटना वाढल्या असून शहरातील तोंडलीकरनगर भागात राहणारे शरद कंटे यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला.
     या बाबत सविस्तर वृत असे की,तोंडलीकरनगर मधील गुरूदत्त कृपा इमारतीत राञी या  इमारतीतील तीन रूम मधे कोणी नसल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन घराचे सेफ्टी डोअर तोडून घरांमध्ये प्रवेश केला. शरद कंटे यांच्या घरातील रोख रक्कम व सोन्याचा हार लंपास केला तर त्यांचे भाडोञी यांच्या घरातील सोन्याची चैन ,ब्रेस लेट व अंगठ्या असा तीन ते चार तोळे सोने लंपास केले आहे.विशेष म्हणजे चोरट्यांनी सी.सी.टीव्ही कॅमेरे फोडले व मशीन सूद्धा घेऊन गेले. या घटनेचा पंचनामा पोलीस हवालदार राम शिंदे यांनी केला असून चोरट्यांचा तपास मुरबाड पोलीस करत आहेत.  .



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *