पिंपरी पेंढार ता. जुन्नर : येथील गाजरपट शिवारात बिबट्याने ठार केलेली कालवड

पिंपरी पेंढारच्या गाजरपट शिवारात बिबटयाचा कालवडीवर हल्ला, कालवड मृत्युमुखी 

424
          पिंपरी पेंढार,जुन्नर  : ( प्रतिनिधी,अशोक डेरे) – जुन्नर तालुक्यातील येथील गाजरपट शिवारात बिबटयाने कालवड फस्त केल्याची घटना आज घडली. आज शनिवार दि.7 डिसेंम्बर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पिंपरी पेंढार ता. जुन्नर येथील गाजरपट शिवारात चंद्रकांत बजाबा डेरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात बिबट्यांने हल्ला करून एक तीन वर्षे वयाची कालवड ठार केली. त्यामुळे त्यांचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. सदर घटनेमधील कालवड मोठी असल्याने गोठ्याच्या बाजुलाच बिबट्याने फस्त केली. सदर घटनेचा पंचनामा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ केला.
            गेल्या अनेक दिवसांपासून दोन बिबट या परिसरात नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत. याच परिसरात नागरिकांना दिवसाही घराबाहेर पडणे कठीण झाले असुन दररोज कुणालातरी बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे त्यामुळे हा परिसर सध्या बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे जाणवते.  या परिसरात नेहमीच बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे येथील ग्रामस्थ भयभित झाले असून या बिबट्याचा मानसांवरही हल्ला होण्याची शक्यता आहे. सध्या शेतीची कांदा लागवड, खुरपणी, पाणी देणे, गहु हरभरा अशी एक ना अनेक कामे शेतकरी सध्या करत आहेत. शेतीच्या कामांना वेग आला आहे. परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करणे कठीण झाले आहे.
             बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी वर्ग मोठया तणावात शेतीची कामे करत आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडुन वनखात्याकडे होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *