तांदळीच्या सरपंचपदी चांगुणाबाई गदादे यांची निवड 

705
      तांदळी,शिरूर : शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या सरपंचपदी आज सौ.चांगुणाबाई दत्तात्रय गदादे यांची निवड करण्यात आली. माजी सरपंच गोरख गदादे यांनी तांदळी गावाचे अडीच वर्ष सरपंच पद भूषविल्यानंतर इतरांना या पदी संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाल्याने आज झालेल्या निवडणुकीत गावच्या सरपंच पदी चांगुणाबाई गदादे यांना सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
       तांदळीच्या सरपंचपदी चांगुणाबाई गदादे यांची निवड झाल्याबद्दल शिरूर पंचायत समितीचे कार्यकुशल व कार्यक्षम सदस्य,जलमित्र राजेंद्र आप्पा गदादे,माजी पंचायत समिती सदस्य मच्छिन्द्र गदादे,महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शामराव खोरे,मेजर सुरेश नलगे,गोरखकाका खोरे,दत्तात्रय खोरे,शिवाजीराव खोरे,जयसिंग कळसकर,आश्रत गदादे,राजकुमार गदादे व  ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *