मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचा विदुयत पुरवठा पूर्ववत : साप्ताहिक समाजशीलच्या बातमीचा दणका  

419
        मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय व सार्वजनिक बांधकाम शिवनेरी विश्रामगृहाची तीस हजार रुपये थकीत वीज बिलामुळे मुरबाड वीज मंडळाकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामे रखडली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली असताना साप्ताहिक समाजशील मध्ये आलेल्या या संदर्भातील बातमीची तातडीने दाखल घेण्यात आली आहे. बातमीच्या दणक्याने या कार्यालयात मध्ये विदुयत पुरवठा पूर्ववत जोडण्यात आला आहे.
       वीज मंडळाचे एक महिन्याच्या थकीत बिल न भरल्याने गेल्या रविवार पासून वीज पुरवठा खंडित केला होता. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात शासकीय शिवनेरी विश्राम गृह असून येथे अनेक मान्यवर येतात. मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने गर्मी मुळे त्रस्त तर शासकीय कांमकाज ठप्प झाले होते  मुरबाड वीज मंडळाने शासकीय कार्यालयाच्या थकीत बील भरू यावर अविश्वास दाखविल्याने या कार्यालयाला अंधारात रहायची वेळ आली होती. तर सरकार डिजिटल इंडिया करण्यासाठी प्रयत्न शील असताना शासकीय कार्यालयातून डिजिटल साधनाने लाईट बिल न भरल्याने शासकीय कार्यालय विना वीज कामकाज करताना दिसत होती. मात्र आज वीजपुरवठा पूर्ववत केल्याने कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.या प्रश्नी परखड वृत्त दिल्याने या कार्यालयाचा तातडीने वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आल्याने सा.समाजशीलचे मुरबाड मधून अभिनंदन होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *