मुरबाड तालुक्यातील पॅथॉलॉजी लॅबच्या गैर व अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मनसे ची मागणी

667
मुरबाड, (-प्रतिनिधी,जयदीप अढ़ाईगे) : मुरबाड तालुक्यातील पॅथॉलॉजी लॅबच्या गैर व अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी मुरबाड मनसे ने केली आहे. मुरबाड तालुक्यातील  रुग्णा कडून पॅथॉलॉजीलॅब च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे निदर्शनास आल्याने रुग्णा कडून योग्य दर न घेता जादा आकारणी करून लूट करणाऱ्या या व्यावसायिक च्या गैर व अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी मुरबाड आरोग्य विभागाकडे केली आहे.
     रुग्णाना अनेक डॉक्टर विविध तपासण्यासाठी या लॅब मध्ये पाठवतात मात्र कुठल्या तपासणीसाठी किती याचे दर लावणे बंधनकारक असताना कुठल्याही तपासणी केंद्रात याचे दरपत्रक नसल्याने मागतील ते पैसे मोजावे लागतात तर तपासणी रिपोर्ट  हे फोनवर सांगितले जातात व तर तपासणी केंद्रात प्रत्यक्ष तज्ञ न बसता शिकाऊ व्यक्ती कडून  तपासण्या करून डिजिटल सह्या  करून  रिपोर्ट दिले जातात तर अनेक हॉस्पिटलमध्ये  स्वतःच्या तपासणी केंद्र असून त्याच्या तपासणीत कायम पेशी वाढणे -घटने अस असत मात्र याच रुग्णाने दुसरीकडे तापसल्यास यात तफावत असल्याचे बोलले जाते त्यामुळे या तपासणी केंद्रात दरपत्रक लावावे व दरफलक न लावता चालणाऱ्या गैर व अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *