महापालिका भवन ते रांजणगाव गणपती बस सेवा सुरु करा -भाविकांची मागणी 

932

  शिक्रापूर,पुणे : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – महापालिका भवन ते रांजणगाव पी एम टी  बससेवा सुरु करण्यात यावी अशी महागणपती देवस्थानला दर्शनासाठी येणाऱ्या भाविक नागरिकांमधून होत आहे.पुणे – नगर राज्य मार्गावर रांजणगाव गणपती हे अष्टविनायक पैकी महत्वाचे देवस्थान आहे . देशाच्या कानाकोप-यातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु  येथे पुण्याकडून येत असताना भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. पुण्याहुन येणा-या  भाविक व नागरिकांना तीर्थक्षेत्र रांजणगावाला थेट जाण्याची  सोय नसल्याने त्यांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो .तसेच एस टी महामंडळाच्या बहुतेक गाड्या या ठिकाणी थांबत नाही. खाजगी वाहने प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशी घेऊनवाहतूक करतात त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे . या मार्गावर १ कि.मी.आंतरावर पंचताराकिंत औद्योगिक वसाहत आहे.या भागातील मोठा वर्ग कामानिमित्ताने पुणे शहारात व तिकडुन कामानिमित्ताने इकडे येत असतात. जाण्या येण्याच्या गैरसोयीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. यापुर्वी प्रशासनाने म.न.पा.ते रांजणगाव ही बससेवा सुरु केली होती. परंतु कसाल्याही प्रकारची सुचना न देता ही बससेवा बंद करण्यात आली. याबाबत अनेकानी पाठपुरावा करुनही बससेवा सुरु होत नसल्याने गणपती दर्शनास येणाऱ्या भाविकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेत प्रशासनाने याबाबत दखल घेऊन म.न.पा.ते रांजणगाव ही बस सुरु कारावी.त्यामुळे उत्पन्नात भर पडुन प्रवाशी वर्गाची सोय होईल.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *