बलिदान दिनानिमित्त मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा

973
     मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे हुतात्मा झालेल्या वीर हुतात्मा भाई  कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी 1 व 2 जानेवारी 2020 रोजी सिद्धगडावर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
      1 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वक्तृत्व व समुहंगान स्पर्धा होणार आहेत. वक्तृत्व स्पर्धेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हुतात्मा वीर भाई कोतवाल व वीर हिराजी पाटील,पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आझाद दस्त्याचे शिलेदार व जे देशासाठी लढले, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी धारातीर्थ सिद्धगड व स्फूर्ती सिद्धगडाची व 11 वि पासून पुढील खुल्या गटासाठी आझाद दस्ता — स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्णपान व सिद्धगड ऐतिहासिक लढा — जतन आणि जाणीव हे विषय आहेत. तसेच या चार गटात समूहगान स्पर्धा होणार आहेत अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी योगेंद्र बांगर — 9272704744 , महेंद्र पवार — 8369171505 , एकनाथ देसले — 9226976798  , यशवंत माळी — 7020279510 यांच्याशीसंपर्क साधण्याचे आवाहन सिद्धगड स्मारक समिती तर्फे करण्यात आले आहे.
     हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना 2 जानेवारी 1943 ला ब्रिटिशांविरोधात लढताना सिद्धगडावर वीरगती प्राप्त झाली. या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीच्या सायंकाळ पासून विविध देशभक्तीपर कार्यक्रम होतात.रात्रभर विद्यार्थी व देशप्रेमी नागरिक मशाली घेऊन सिद्धगडावर येतात 2 जानेवारीच्या  सकाळी 6 वाजून दहा मिनिटांनी हुतात्माज्योत प्रज्वलित करून मानवंदना दिली जाते. ठाणे व रायगड जिल्ह्यातील हजारो देशप्रेमी नागरिक या कार्यक्रमासाठी सिद्धगडाच्या जंगलात उपस्थित असतात.या कार्यक्रमास राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे,खासदार कपील पाटील,मुरबाडचे आमदार किसन कथोरे,स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय यांचेसह ठाणे, रायगड, पुणे, नगर जिल्ह्यातील नागरिक उपस्थित राहणार आहेत.
     यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी असून घनदाट जंगलात निर्मनुष्य ठिकाणी असणाऱ्या सिद्धगडावरील हुतात्मा स्मारक परिसरात नागरिकांसाठी शासनातर्फे यावर्षी वीज पुरवठा,पिण्याचे पाणी,शौचालय,रस्ता,वैद्यकीय सुविधा आदी सुविधांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *