दोंडाईचा, धुळे : हस्ती आनंद मेळाव्याचे आयोजन

429
दोंडाईचा, धुळे : (– प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : लायन्स क्लब आणि शताब्दी तथा लायन्स परिवार यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील हस्ती आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  आनंद मेळाव्यामध्ये दूरदर्शन गायक अवधूत रेगे व हास्यकलाकार जुनिअर प्रेम चोप्रा तथा प्रेम चौधरी या यांचा कार्यक्रम खास आकर्षण असणार आहे. हस्ती आनंद मेळावा ३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० अशा दोन दिवसांमध्ये आयोजीत करण्यात आला आहे. आज सकाळीच या कार्यक्रमाचे भूमिपूजन माजी नगरसेवक घनश्याम अग्रवाल, हिरालाल शर्मा व पालिकेचे बांधकाम सभापती निखिल राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हस्ती बँकेचे चेअरमन कैलास जैन, लायन्स क्लबचे अध्यक्ष राकेश अग्रवाल, सचिव पाटील कोषाध्यक्ष, आशिष अग्रवाल, किशोर जैन, झोन चेअरमन कन्हैया बागल, चोईत कुकरेजा, दिनेश व्होरा, अनिल अग्रवाल, प्रमोद बोरसे, विकी शर्मा, भरत शर्मा, संजय अग्रवाल, दीपक घोडके, सचिन अग्रवाल, विशाल सोनार, अभय कवाड, गौतम माखिजा, हमजा जीवनाला, डॉ. ललीतकुमार चंद्रे आदी उपस्थित होते. हस्ती आनंद मेळाव्यामध्ये महिलांसाठी देखील कुकिंग कॉम्पिटिशन वेशभूषा केशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर तरुणांसाठी समूह नृत्य स्पर्धा बॉलीवूड कॉन्टॅस्ट क्वीज यांचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणूनच हस्ती आनंद मेळावा शहरवासियांसाठी खास आकर्षण ठरत आलेला आहे. या वर्षीही आनंद मेळावाचा लाभ शहरवासीयांनी घ्यावा असे आवाहनही लायन्स परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुगंधा जैन ,मंदाकिनी पाटील, राजन कुकरेजा, शितल जैन, नम्रता अग्रवाल, मनीष अग्रवाल, वैशाली अग्रवाल, सुवर्णा रुणवाल, राणी अग्रवाल, संजय रूपचंदानी, दिनेश पवार आदी परिश्रम घेत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *