शिक्रापूर,पुणे : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगीकरांचे चासकमानच्या पाण्यासाठी आंदोलन, अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

515

           शिक्रापूर,पुणे : निमगाव म्हाळुंगी ता. शिरूर येथील शेतकऱ्यांना नेहमीच चासकमानच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने येथील शेतकऱ्यांनी चासकमान विभागाकडे निवेदनाद्वारे पाणी सोडण्याबची मागणी केली होती.पाणी न सोडल्यास अकरा ऑक्टोबर रोजी चासकमान कार्यालावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज नुकतेच निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर यावेळी चासकमान अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

             निमगाव म्हाळुंगी ता. शिरूर येथील शेतकऱ्यांना नेहमी चासकमान कालव्याच्या चारी क्रमांक १३ – ७ चारीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून चासकमान विभागाकडे पाणी सोडण्याबाबत लेखी निवेदन दिले होते. तर पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला होता. त्यानंतर देखील शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्याने आज शेतकऱ्यांच्या वतीने चासकमान कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, निमगाव म्हाळुंगीच्या सरपंच रेश्मा काळे, उपसरपंच महेंद्र रणसिंग, पोलीस पाटील किरण काळे, माजी उपसरपंच व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष तेजस यादव, ग्रामपंचायत सदस्या ज्योती शिर्के, भरत विधाटे, माजी सरपंच हनुमंत काळे, कासारीचे सरपंच संभाजी भुजबळ, दादासाहेब रणसिंग, काळूराम चव्हाण, चेअरमन दादाभाऊ काळे, संतोष करपे, गणेश शिर्के, शंकर लांडगे, महेश घोरपडे, उमेश चव्हाण, रावसाहेब चव्हाण यांसह आदी महिला व शेतकरी उपस्थित होते. त्यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर निमगाव म्हाळुंगीतील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन चासकमान कालव्यासाठी गेली असताना देखील शेतकऱ्यांना पाण्यापासून रहावे लागते. त्यामुळे चासकमान विभागाने वेळीच योग्य निर्णय घ्यावा अन्यथा नेहमी आंदोलन करण्याची वेळ आल्यास निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील शेतकरी व उपस्थितांनी दिला. त्यानंतर चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या वतीने निमगाव म्हाळुंगी येथील खरीपाचे आवर्तन सोडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळे पर्यंत आवर्तन बंद करणार नसून निमगाव म्हाळुंगीला पुरेसे पाणी मिळाल्यानंतर आवर्तन पुढे नेले जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

-प्रतिनिधी,शेरखान शेख,(सा.समाजशील,शिक्रापूर)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *