शिक्रापूर,पुणे : शिक्रापुरात इंधन दरवाढी बाबत युवक कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन, दरवाढी बाबत केला सरकारचा निषेध

375

 

         शिक्रापूर,पुणे :  शिक्रापूर ता. शिरूर येथे शिरूर तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने नुकतेच पेट्रोल व इंधन दरवाढीबाबत सरकारचा निषेध व्यक्त करत पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले.तर यावेळी राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

           शिक्रापूर ता. शिरूर येथील चाकण चौकात असलेल्या पेट्रोलपंप येथे शिरूर तालुका युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संकेत गवारी यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच पेट्रोल व इंधन दरवाढीबाबत आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार महेश ढमढेरे, पुणे जिल्हा महिला सरचिटणीस शोभा वाघचौरे, शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव, शिरूर तालुका युवक तालुकाध्यक्ष संकेत गवारी, प्रदीप मेहकरे, लिंबाजी साठे, शिरूर तालुका महिलाध्यक्ष मीनाक्षी कुरंदळे, उपाध्यक्षा चंदना गायकवाड, युवती तालुकाध्यक्ष शितल आनंदे, राहुल वर्पे, आर्यन गायकवाड, अनिल यादव, अमोल हरगुडे, सतीश हरगुडे, नितीन जगदाळे, विष्णू घोरपडे, नाना ढमढेरे यांसह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना शासनाने केलेली इंधन दर वाढ अयोग्य असून शासनाने केलेली दरवाढ शंभरी ओलांडेल असे मत व्यक्त करत शासनाने इंधन दरवाढ कमी करून त्यावर आकारला जाणारा कर कमी करावा अशी मागणी पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले. तर यावेळी बोलताना सर्व सामान्य नागरिकांना इंधनाचे दर परवडत नसून मोठी झळ सर्वसामान्यांना बसत असल्याचे सांगत सध्याचे सरकार हे दरवाढ करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे महेश ढमढेरे यांनी सांगितले. यावेळी बोलताना इंधन दरवाढमुळे महिलांची होणारी बचत खुंटली असल्याचे महिला जिल्हा सरचिटणीस शोभा वाघचौरे यांनी सांगितले. तर यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला असून इंधनाचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

-प्रतिनिधी,शेरखान शेख,(सा.समाजशील,शिक्रापूर)




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *