शिरूर,पुणे : ऊसदर व विविध प्रश्नावर क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे करणार सर्व समविचारी संघटनांच्या वतीने दि. 15 नोहेंबर पासून घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन,आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु

936
                     शिरूर,पुणे : दरवर्षी गळीत हंगाम सुरू झाला की साखर कारखान्यावर विविध मागण्या संदर्भात आंदोलन ही ठरलेली बाब. परंतु यावर्षी गळीत हंगाम सुरू होऊन ही अद्याप कोणीही ऊसदर किंवा अन्य प्रश्नावर आंदोलन पुकारले नव्हते.अशातच ऊस उत्पादक,सभासद शेतक-यांच्या विविध महत्वपूर्ण प्रश्नांना हात घालत क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे करणार सर्व समविचारी संघटनांच्या वतीने दि. 15 नोहेंबर पासून घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाची राजकीय वर्तुळात मोठीच चर्चा सुरु  झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे.शिरुर हवेलित ऊस पट्टा मोठा असुन पाचंगे यांचे हे आंदोलन यशस्वी झाले तर या अगोदरची पाचंगे यांनी जनहिताच्या दृष्टीने यशस्वी केलेली आंदोलने व सर्वसामान्यांचे प्रश्न निर्भीडपणे मांडून ते मार्गी लावण्याचे त्यांच्याकडे असणारे कौशल्य व अशा आंदोलनासाठी त्यांना समाजाच्या विविध स्तरातून मिळणारी जोरदार साथ यामुळे आगामी निवडणुकीत संजय पाचंगे यांनी शिरुर हवेलि मधुन लढण्याची जोरदार तयारी सुरू केली असल्याचे पाहावयास मिळत आहे. सर्वसामान्यांतुन मिळणाऱ्या पाठिंब्यातून पाचंगे हे शिरूर-हवेलीत मातब्बर उमेदवारांपुढे आव्हान उभे करू शकतील अशा चर्चा आता रंगू लागल्याने राजकीय पटलावर सुध्दा पाचंगे यांच्या या आंदोलनाचे पडसाद उमटायला सुरवात झाली आहे.
                  पुढील महिन्यात  दि. 15 नोहेंबर ला क्रांतिवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन जाहीर केले आणि शेतकऱ्यांच्या मनातील भावनांना एकप्रकारे वाटच मिळाली असे चित्र आता दिसायला लागले आहे. संपूर्ण शेतकरी वर्गाचे या आंदोलनाकडे लक्ष लागले आहे. संजय पाचंगे आणि त्यांच्या सहकार्यांचे आंदोलन हे अभ्यासपूर्ण, व्यापक समाजाच्या हितासाठी व शेवटपर्यंत निर्णयक ठरत असल्याचे त्यांच्या आंदोलनातून स्पष्ट होत आहे.नुकतेच त्यांनी शिक्रापूर येथे समविचारी संघटनांच्या पाठिंब्यातून शिक्रापूर -पुणे रस्त्याच्या कामा संदर्भात केलेले आमरण उपोषण व शासन स्तरावर ५ दिवसात घेतलेली या आंदोलनाची दखल व त्यातून मार्गी लागणार असल्याचे या रस्त्याचे काम यातून हे दिसून येते.
संजय पाचंगे – अध्यक्ष, क्रांतिवीर प्रतिष्ठाण 
हे आंदोलन राज्यातील साखर कारखान्यांना दिशा देणारे असणार असुन गुजरात मधे उसाला पाच हजार रुपयांपर्यंत बाजारभाव देणे त्यांना शक्य आहे मग आपल्याकडे का नाही ?  ते कसे शक्य आहे हे आम्ही शासनाच्या समोर व कारखान्याचे समोर मांडणार आहोत. तसेच घोडगंगा मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी देखील आहेत.तर या पार्श्वभूमीवर  होणारे हे आंदोलन नक्कीच निर्णायक  ठरेल अशी आशा आहे.    
– प्रा.सुभाष शेटे,(सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *