मुरबाड,ठाणे : मुरबाड राष्ट्रीय महामार्ग 61 वर तीन हात नाक्यावर टँम्पो च्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यु, तीन रिक्षा ना पण बसला दणका

776
           मुरबाड,ठाणे : मुरबाड राष्ट्रीय महामार्ग 61 वर तीन हात नाक्यावर आज पोलिस चौकी समोरीलच रिक्षा स्टँन्ड जवळ एका छोटा हत्ती टेम्पो ने  मोटर सायकल ला धडक दिल्याने मोटरसायकल स्वार जागीच मृत पावला तर तीन रिक्षा ना ही या आपघाताची झळ पोहचली आहे.
            याबाबत सविस्तर वृत्त असे कि भालचंद्र रघुनाथ वेंखडे (36)हा कल्याण दिशेने मुरबाड कडे येत असताना राष्ट्रीय महामार्ग 61वर  तीन हात नाका पोलिस चौकी च्या समोरच त्याच दिशेने येणाऱ्या उल्हासनगर येथुन साबण घेवुन येणाऱ्या एम एच 05 बी एल 6199 या छोटा हत्ती टँम्पो ने धडक दिली.  यात मोटर सायकल स्वार वेखंडे हा जागीच मृत पावला. वेखंडे हा मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष किसन कथोरे यांचा मावस भाऊ असुन या आपघाता मुळे राष्ट्रीय महामार्गावर तणाव वाढला होता. मात्र पोलिसानी वेळीच दखल घेतल्याने तणाव दुर झाला. पोलिसानी चालकाला ताब्यात घेतले असुन पुढील तपास मुरबाड पोलीस करीत आहेत.
          या आपघाता मुळे राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण, अवैध पार्किंग, मासळी बाजार व महत्वाचा तीन हात नाका या महत्वाच्या ठिकाणी गतीरोधक नसल्याने या विषयाची चर्चा शहरात जोर धरु लागली आहे. मुरबाड शहरात प्रवेश द्वारा पासुन ही धोकादायक पोल,अवैध पार्कीग,   फुटपाथ वरिल अतिक्रमण, या मुळे आपघाताची शक्यता असल्याने या घटने नंतर होता असलेल्या चर्चे मुळे पुन्हा मुरबाड नगरपंचायती समोर संकट उभे रहाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
  – प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *