जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धा,जांबूतच्या आदर्श ज्युनिअर कॉलेजची नेत्रदीपक कामगिरी,धनश्री संभाजी डेरे हिस ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक व सुवर्णपदक,धनश्रीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड 

1263
         जांबुत,शिरूर : (ब्युरो रिपोर्ट) :  दिनांक 5 व  6 आक्टोंबरला पुणे जिल्ह्यातील बारामती येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत   शिरूर तालुक्यातील जांबूतच्या धनश्री संभाजी डेरे हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक व सुवर्णपदक मिळविले आहे. या स्पर्धेत जांबूतचे ५ विद्यार्थी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत बक्षीस पात्र ठरले असून धनश्री डेरे या विद्यार्थीनिची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ वर्षे वयोगटात जांबूतच्या धनश्री संभाजी डेरे या विद्यार्थिनीने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक मिळविले. या जोरदार कामगिरीमुळे धनश्रीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१४ वर्षे मुलांच्या वयोगटातील प्रतीक चोरे या विद्यार्थ्याने गोळाफेक स्पर्धेत जिल्ह्यात व्दितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक प्राप्त केले तर १४ वर्षे मुलींच्या गटात दीक्षा पोकळे हिने नेत्रदीपक कामगिरी करीत जिल्ह्यात ३ रा क्रमांक मिळवत कांस्यपदक मिळविले.
१७ वर्षे मुलींच्या गटातील १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कल्याणी उचाळे हिने जिल्ह्यात ३ रा क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले.तर याच महाविद्यालयाची प्रियांका शिस्तार हिने १९ वर्षे मुलींच्या गटात ३ किमी. धावण्याच्या स्पर्धेत ३ रा क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले आहे.
      जांबूतच्या धनश्री डेरे व इतर शालेय स्पर्धकांनी जिल्ह्यास्तरीय मैदानी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करीत जांबुत गावाचे नाव उंचावले असल्याची व अभिमानास्पद कामगिरी केल्याची प्रतिक्रिया सरपंच डॉ.जयश्री जगताप यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
      तर विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे,पुण्याचे उपजिल्हाधिकारी तथा राज्य ई फेरफार प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,भीमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे पाटील, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे,माजी पं.स.सदस्य वसुदेव अण्णा जोरी, माजी चेअरमन बाळासाहेब पठारे,माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया,बाळकृष्ण कड,सिताराम म्हस्के व ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,मार्गदर्शक शिक्षकांचे व महाविद्यालयाचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *