जांबुतला बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार,बेजबाबदार,सुस्त प्रशासन व वन विभागावर माजी आमदार पोपटराव गावडेंची संतप्त प्रतिक्रया

1114
      जांबुत,शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  शिरूर तालुक्यातील जांबुतच्या जोरी लवण वस्तीवर घरासमोर अंगणात असलेल्या एका २ वर्षाच्या बालिकेवर रात्री १० च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत तिला बाजूच्या शेतात पळवून नेले. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात २ वर्षाची समृद्धी योगेश जोरी ही चिमुकली ठार झाल्याची घटना घडली आहे. या चिमुकलीला घरा बाजूकडील देवीच्या मंदिरा मागील विजेच्या खांबाजवळ शेतात नेत तिला ठार केले. गणेश सरोदे,योगेश जोरी,प्रशांत जोरी व स्थानिक नागरिकांनी या मुलीचा शोध घेतला असता रात्री ११ च्या दरम्यान मुलीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेने जांबुत व परिसरात एकच खळबळ उडाली असून शिरूरच्या पश्चिम भागात बिबट्याच्या दहशतीने मोठीच भीती पसरली आहे.
      या भागात मोठ्या प्रमाणात बिबटयांचा वावर असताना व माणसावर बिबटयांचे हल्ले होण्याच्या घटना घडल्या असताना वन विभाग व प्रशासकीय अधिकारी अतिशय सुस्तच असल्याची संतप्त प्रतिक्रिया माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दिली. या घटनेला सर्वस्वी वन विभाग जबाबदार असुन,वेळो वेळी अधिकाऱ्यांना सांगुन सुद्धा कोणतीही, उपाय योजना केली जात नाही. त्यामुळे परीसरात तीन, चार, लोकाना व अनेक पाळीव प्राण्यांना बिबटयाच्या हल्यात नाहक जीव गमवावा लागला.वन खाते सामान्य लोकाना त्रास देणारे खाते झाले असल्यांचे सांगत माजी आमदार पोपटराव गावडे ही अत्यंत आक्रमक झाले होते.
      तर या नरभक्षक बिबट्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त न केल्यास आमदार दिलीप वळसे पाटील,पोपटराव गावडे यांच्या माध्यामातून या भागातील नागरिकांना,शेतकऱयांना जाणवणाऱ्या विविध समस्या सोडविण्याकामी दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात धडक मोर्चा काढण्याचा इशारा भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी दिला.
    तर वन विभागाच्या शिरूर,घोडेगाव,ओतूर येथील पथकाने या घटनेची गंभीर दखल घेत या ठिकाणी आजच ७ पिंजरे लावले असल्याची व शासकीय नियमाप्रमाणे पिडीत कुटुंबाला योग्य ती मदत देणार असल्याची माहिती शिरूरचे वन अधिकारी म्हसकर यांनी दिली.
       यावेळी घटना स्थळी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकरचे संचालक प्रदीपदादा वळसे पाटील, टाकली हाजीचे सरपंच दामुशेठ घोडे,जांबूतच्या सरपंच डॉ. जयश्री जगताप,माजी उपसरपंच गणेश सरोदे यांच्यासह मोठया प्रमानात ग्रामस्थ जमले होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *