कवठे येमाई,शिरूर : शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांप्रती विद्यार्थ्यानी आदर ठेवावा – जेष्ठ पत्रकार,सुभाष शेटे, रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल कवठे येमाई येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा  

651
           कवठे येमाई,शिरूर : शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांप्रती विद्यार्थ्यानी आदर ठेवावा असे आवाहन  जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे यांनी केले.ते आज शिरूर तालुक्यातील  रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल कवठे येमाई येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे हे होते. रयत शिक्षण संस्थेच्या शिरूर तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल कवठे येमाई येथे आज 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम शिक्षण महर्षी डाँ सर्व पल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचा हस्ते पुजन करण्यात आले.यावेळी शिरुर पंचायत समिती सदस्य डाँ सुभाष पोकळे ,सरपंच अरुण मुंजाळ,स्कुल कमेटीचे अर्जुनदादा सांडभोर,मिठुलाल बाफणा,अध्यक्ष रितेश शहा,विजय गांधी,बबनराव पोकळे,बाबुशा पाटील कांदळकर,प्राचार्य बेलकर,सर्व शिक्षक,विद्यार्थी व मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांनी शिक्षकदिनाचे महत्व व विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यानी शाळेत ज्ञानदानाचे अविरत कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदर करीत शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता प्राप्त केल्यास पुढील जीवनात भरारी घेण्यास त्यांना नक्कीच फायदा होईल असे सांगितले.
तर प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले शिरूर पंचायत समितीचे सदस्य डाँ सुभाष पोकळे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करताना महत्वपुर्ण विचार मांडले.यावर्षी अनेक क्षेत्रात शाळेची प्रगती व गुणवत्ता उंचावणा-या शाळेतीत सर्वच शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्माचा-यांचा आज मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात येऊन सर्वांना शिक्षकदिनाच्या शुभेचछा देण्यात आल्या. तर विद्यार्थ्यानी आज शिक्षकांची उत्कृष्ट भूमिका साकारत अध्यापनाचे काम पाहिले.
विद्यालयाचे प्राचार्य बेलकर यांनी आभार मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *