निरा नरसिंहपूर,इंदापूर : टनु येथे जाणता राजा युवा व ग्राम विकास प्रतिष्ठाणच्या वतीने गणरायाची उत्साहात स्थापना

591
         निरा नरसिंहपूर,इंदापूर : (प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार) – इंदापूर तालुक्यातील टनु येथे जाणता राजा युवा व ग्राम विकास प्रतिष्ठाणच्या वतीने गणरायाची उत्साहात स्थापना करण्यात आली.प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. सरपंच सोमनाथ भैया मोहिते पाटील यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन व प्रयत्नातून हा गणेशोत्सव सोहळा टनु येथे मोठ्या उत्साहात सुरु झाला.

जाणता राजा युवा व ग्रामविकास प्रतिष्ठान टणू यांच्या मार्गदर्शनाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणरायाची स्थापना करण्यात आली.  मागील पंचवीस वर्षापासून परंपरेनुसार प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गणरायाची स्थापना करण्यात येत आहे.  गणेशोत्सवानिमित्त रोज सकाळी आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांसमवेत आरती आणि महाप्रसाद नियमाप्रमाणे देण्यात येत असतो.  मोठ्या आनंदाने गणरायाचे आगमन झाल्यानंतर सर्व नागरिक आणि टणु गावातील ग्रामस्थ यांनी यावर्षी गणरायाला एकच मागणं मागितले आहे ते म्हणजे  मेघराजा कडकडून येऊ दे, बळीच राज्य येऊ दे, माझा शेतकरी राजा सुखी होऊ दे,असं मागणं गणरायाकडे करण्यात आले आहे.

        या गणेश उत्सवानिमित्त गणरायाची स्थापना करण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मोहिते पाटील मा. सरपंच सोमनाथ भैया मोहिते पाटील, राजू मोहिते सर, संतोष मोहिते, अमृत मोहिते, संजय देशमुख, महावीर जगताप, तानाजी मोहिते, तविराज मोहिते, किरण मोहिते, नवनाथ मोहिते, पांडुरंग मोहिते, अभिजीत मोहिते, राष्ट्रवादी महिला तालुका उप अध्यक्ष शोभाताई मोहिते,टणु येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *