शिक्रापूर,पुणे : लोकशाहीचा ४ स्तंभ असलेले पञकार हे समाजासाठी आदर्श आहेत – पुणे जि.प. सदस्या कुसुमताई मांढरे,साप्ताहिक समाजशील व न्यूज नेटवर्कचे वरिष्ठ पत्रकार राजाराम गायकवाड यांचा यथोचित सत्कार

442

        शिक्रापूर,पुणे : पञकार हा लोकशाहीचा ४ था असुन त्या माध्यमातुन चांगल्या वाईट घटना प्रभावीपणे मांडाण्याचे काम वृतपञ करत आहेत. पञकार हे समाजासाठी आदर्श आहेत असे प्रतिपादन पुणे जि.प. सदस्या कुसुमताई मांढरे यांनी केले. शिक्रापूर ता.शिरूर येथील विद्याधाम प्रशाला येथे आज रविवार दि. ६ ला  राष्ट्रीय पञकार दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रशालेचे प्राचार्य नरेंद्र व्यवहारे होते.  यावेळी शिक्रापूरच्या सरपंच जयश्री भुजबळ, जि.प.सदस्या कुसूम मांढरे ,पर्यवेक्षक बाबुराव कोकटे, ज्ञानेश्वर कुंभार, सुभाष कुरंदळे व शिक्षक बंधू उपस्थित होते.  यावेळी क्रांती ज्योती साविञीबाई फुले,सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.  ,कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे उपप्राचार्य आर टी शिंदे यांनी केले .यावेळी पञकार संघाचे जेष्ठ  पञकार ज्ञानेश्वर मिडगुले,एन बु मुल्ला,दैनिक सामना व साप्ताहिक समाजशील व न्यूज नेटवर्कचे वरिष्ठ पत्रकार राजाराम गायकवाड यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी परिसरातील इतर पत्रकार ही उपस्थित होते.आभार संतोष परदेशी यांनी मानले.

 -प्रा सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *