अलिबाग,रायगड : मुस्कान अभियानांतर्गत रोहा पोलिसांची उत्कृष्ठ कामगिरी,पळून गेलेल्या मुलाला केले पालकांच्या स्वाधिन,रोहा पोलिसांचे होतेय परिसरातून कौतुक

452
         अलिबाग,रायगड : मुस्कान अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा पोलिसांनी उत्कृष्ठ कामगिरी करीत पळून गेलेल्या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधिन केले आहे.पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यासाठी  रायगडात मुस्कान अभियान राबविण्यात आले आहे.त्या अनुषंगाने वर्दळीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पोलिस गस्त घालून संशयास्पद बालकांची विचारपूस करत असतात. दिनांक 4 जानेवारी 2019 रोजी मध्यरात्री रोहा रेल्वेस्टेशन जवळ  पोलिस  उपनिरीक्षक सचिन निकाळजे, ए एस आय दीपक म्हाशिलकर आणि वाहन चालक पोलिस नाईक प्रशांत म्हात्रे हे राऊंड मारत असताना त्यांना एक अल्पवयीन मुलगा एकटाच फिरत असलेला अढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि चौकशी दरम्यान या मुलाचे नाव सिराज असून हा मुलगा नेपाळ काठमांडू येथील असल्याचे त्यांना समजले.
        त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील बॅग उघडली आणि त्यात त्यांना त्याचा मामा मौलाना शेख याचा कॉन्टॅक्ट नंबर सापडला. त्यावर पोलिसांनी ताबडतोब कॉल केला आणि त्यांच्या लक्षात आले ही हा मुलगा दिनांक1 जानेवारी रोजी नेपाळ मधील आपल्या घरून पळून आला असून त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत आहेत. त्याचा सातारा येथे राहत असलेला मोठा भाऊ सरफराज मुमताज शेख याला सिराजला घ्यायला पाठवतो असे सिराजच्या मामाने पोलिसांना सांगितले.
 त्यानुसार त्या मुलाकडे चौकशी करून खात्री पटल्यावर पोलिसांनी आज सीराजला त्याच्या भावाच्या स्वाधिन केले.रोहा पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील,अलिबाग,रायगड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *