कवठे येमाईत चोरट्यांकडून बी बियाणांचे दुकान फोडले – सीईटीव्ही केले लंपास – रोख रकमेसह एक लाखांची चोरी – शेजारील कपड्याचे दुकान ही फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी 

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाईत अष्टविनायक महामार्गालगत श्री येमाई चौक नजीक असलेले भोर बी बियाणांचे दुकान आज बुधवार दि. २३ ला पहाटे दोन ते साडेतीनच्या दरम्यान दुकानाच्या बाजूकडील पत्रा उचकटून चोरट्यांनी तेथून दुकानात प्रवेश करीत दुकानातील बी बियाणे,रोख रक्कम सहा हजार सीसीटीव्ही, डीव्हीआर चोरून नेला. या घटनेत भोर यांचे रोख रकमेसह सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे योगेश सैद यांनी सांगितले. तर दुकानाच्या आजू बाजूने लावलेल्या काही कॅमेरांची तोडफोड करून नजीकच टाकून दिले. दरम्यान शेजारीच असलेले शिवनेरी कलेक्शन हे कपड्याचे दुकान ही चोरट्यांनी मागील बाजूने फोडण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. या घटने बाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळविण्यात आले असून शिरूर पोलीस घटना स्थळी लगेचच दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 या परिसरात अनेक अनोळखी व्यक्ती दुचाकी वरून व्यवसाय करण्याच्या निमित्ताने या भागात वाड्यावस्त्यांवर फिरत असून अशा लोकांची आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किमान नागरिकांनी चौकशी करण्याची गरज आहे. आज पहाटेच्या दरम्यान घडलेल्या या चोरीच्या घटने मुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा पुन्हा सुळसुळाट सुरु झाला असून गावागावात आता ग्रामसुरक्षा दल तात्काळ सक्रिय करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds