समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुण्याच्या कसबा पेठ परिसरातील स्वप्नील सुरेश समेळ (वय ४० वर्षे) हा युवक गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाला असून याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे समेळ कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास स्वप्नील समेळ हे कसबा पेठ, तांबट हौद, पुणे – ११ येथील राहत्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते अद्यापपर्यंत घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला.मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर फरासखाना पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्वप्नील समेळ यांचा रंग गोरा, चेहरा उभट, उंची सुमारे ५ फूट ८ इंच असून ते घरातून बाहेर पडताना पांढऱ्या रंगाचा चेक्सचा शर्ट व डार्क चॉकलेटी रंगाची पँट परिधान केलेली होती. त्यांच्या हातावर मोबाईल क्रमांक गोंदवलेला असल्याची विशेष ओळख आहे. ते मराठी भाषा बोलतात अशी माहितीही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
या प्रकरणी कुटुंबीयांकडून शोध सुरू असून कोणाला स्वप्नील समेळ थोडेफार वाकून चालणारे गृहस्थ यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी किंवा कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फरासखाना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.तर या व्यक्तीचा ठावठिकाणा,शोध मिळवून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती दीपक सुरेश समेळ यांनी दिली असून 9823376880 या क्रमांकावर तातडीने संपर्क करण्याचे आवाहन समेळ कुटुंबियांनी केले आहे.तसेच ही व्यक्ती एखादे देवालय,हॉटेल किंवा ढाबा या ठिकाणी असू शकेल असा विश्वास त्यांचे बंधू दीपक यांनी व्यक्त केला आहे.

कसबा पेठेतील ४० वर्षीय युवक स्वप्नील समेळ बेपत्ता ; पुणे फरासखाना पोलिसांत नोंद
BySamajsheel NewsMarch 10, 20260
Previous Postवरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे यांची यांची युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय मीडिया प्रमुख मार्गदर्शकपदी निवड
Next Postपारंपारिक पद्धतीने कवठे येमाई येथे भव्य शिवजयंती उत्सव ; बजरंग दलाचे आयोजन कौतुकास्पद
