समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे दि. १३ जुलै रोजी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गावातील व्यक्तींना “आमदाबाद भूषण” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारात ज्या ज्या व्यक्तींनी गावाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाला सन्मान देण्याचा प्रयत्न आमदाबाद ग्रामपंचायत तसेच आमदाबाद नगरीच्या प्रथम नागरिक सौ . अनिता ताई घुले,माजी आदर्श सरपंच पोपटराव घुले यांच्या विशेष प्रेरणेतून आणि प्रयत्नातून पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉ. संदीप सांगळे,याच गावचे भूषण तहसीलदार पदी विराजमान असलेले सन्माननीय प्रदीप पवार,सरपंच सौ.अनिताताई घुले. माजी सरपंच पोपटराव घुले, माजी सरपंच योगेशराव थोरात,माजी सरपंच प्रकाश थोरात, माजी सरपंच सोनाली ताई थोरात, विद्यमान उपसरपंच सविताताई माशेरे,माजी.उप सरपंच प्रदिप साळवे माजी उपसरपंच कांताराम नर्हे ग्रा .प.सदस्य राजेंद्र शिंदे सामाजिक कार्यकर्ते अविनाश शेठ सोनार, ग्रामसेवक यमराज हंगे माजी मुख्याध्यापक मोहनराव थोरात गुरुजी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सखाराम थोरात .पोपटराव जाधव, सतिश थोरात, राजेंद्र माशेरे. सोसायटी चे चेअरमन आबासाहेब आधव, व्हाईस चेअरमन बंडु थोरात व इतर मान्यवर मंडळी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये सामाजिक शैक्षणिक ,राजकीय, कला, क्रीडा विज्ञान साहित्य या क्षेत्रात विशेष मानांकन प्राप्त असणाऱ्या सर्वच नामांकित व्यक्तींचा सन्मान देऊन येथोचित सत्कार करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत व सरपंच सौभाग्यवती अनिताताई घुले यांनी करण्याचा प्रयत्न केला. याच कार्यक्रमात कचरा व्यवस्था साठी घंटा गाडीच पुजन तर सेवा निवृत्त ग्रामपंचायतीचे सेवक सोपानराव माशेरे यांचाहि सन्मान करण्यात आला . प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीवर आपल्या गावाची कौतुकाची थाप असावी या प्रेरणेतून हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ह. भ. प. शुभम महाराज थोरात,प्रा. ह भ प नवनाथ महाराज माशेरे डॉ दत्तात्रय जगताप सर यांनी केले. तर आभारअविनाश सोनार यांनी मानले कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमातून या नगरीमध्ये अतिशय ऊर्जात्मक वातावरण तयार झाले असून प्रत्येक जण या नगरीचा नावलौकिक पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील अशी प्रत्येक सन्मानार्थी कडून ग्वाही देण्यात आली