कु.विश्वराज सुधीर शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आठवा

192
पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) परीक्षेचा परीक्षेचा बहुप्रतिक्षित अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी  त्यानुसार राज्यातील पाचवीच्या 16 हजार 693 तर आठवीच्या १५ हजार 93 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ऑफ यांनी निकालाबाबतची माहिती दिली. राज्यात परीक्षा परिषदे कडून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते. स्पर्धा परीक्षांचा पाया म्हणून या परीक्षांकडे पाहिले जाते. यंदा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी मध्ये घेण्यात आली होती.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल मधील विद्यार्थी कु.विश्वराज सुधीर शिंदे याने शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यात क्रमांक मिळवणे म्हणजे खूप मोठे यश असून, विश्वराज याने अभ्यासात खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे त्याला चांगली कामगिरी करता आली असल्याचे ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल चे प्राचार्य गौरव खुटाळ यांनी सांगितले. तर परिसरातून तसेच शाळेकडून त्याचे खूप कौतुक आणि अभिनंदन हात आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही एक अतिशय कठीण परीक्षा असते. या परीक्षेत राज्यात क्रमांक मिळवण्यासाठी खूप हुशार असणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्याने यासाठी अथक परिश्रम घेतले, त्यासाठी त्याला त्याच्या शिक्षकांनी आणि पालकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तर त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.राजेराम घावटे यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds