समाजशील न्यूज नेटवर्क,राजगुरूनगर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – खेड (राजगुरूनगर) तालुक्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात नुकतीच खेड पंचायत समिती मधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये एका विषेश बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सुमारे ८० ते ९०दिव्यांग महिला व तरुण बांधव उपस्थित असल्याची माहिती खेड तालुका युवा क्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुश आगरकर यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.तालुक्याच्या अगदी दुर्गम भागातून ही अनेक दिव्यांग बांधव या विशेष बैठकीस उपस्थित होते. यावेळी दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे निवेदन खेड गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना देण्यात आले.यावेळी तालुक्यातील आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशन, युवा क्रांती फौंडेशन,चेतना फाउंडेशन,राष्ट्रवादी दिव्यांग सेल यांच्या वतीने गट विकास अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली.
गट विकास अधिकारी शिंदे यांनी यांनी उपस्थित दिव्यांग बांधवाना सविस्तर मार्गदर्शन केले . प्रत्येक दिव्यांगांच्या अडीअडचणी समजून घेत त्याच्यावर पर्याय ही सांगितला. उपस्थित दिव्यांगांच्या चेहऱ्यावर यावेळी आत्यंतिक आनंद व समाधान दिसत होते.




मागील दोन महिन्यापासून खेड तालुक्यातील काही दिव्यांगांचे संजय गांधी अनुदान जमा होत नव्हते. खेड तहसील कार्यालयामधील संजय गांधी ऑफिस मध्ये सर्व दिव्यांगांना नेऊन तेथील संजय गांधी ऑफिस मधील तहसीलदार मॅडम यांना दिव्यांगांच्या मानधन मिळत नसल्याच्या अडचणी सांगितल्या. त्या ऐकून घेत योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच ज्या दिव्यांगाने आज पर्यंत आधार कार्ड काढले नाहीत बोटाचे ठसे न आल्यामुळे त्या दिव्यांगांचे विशेष नोंद करण्यासाठी मॅडमनी अर्ज मागविले असल्याचे ही आगरकर यांनी सांगितले. दिव्यांगांच्या या विशेष बैठकीचे आयोजन करण्याकामी आपूलकी दिव्यांग फाउंडेशन चे अध्यक्ष विजय पगडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.