समाजशील न्यूज नेटवर्क: निमगाव सावा,जुन्नर (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील ग्रामपंचायत सभागृहात जलसंपदा विभागा मार्फत सध्या सुरू असलेल्या सिंचन सप्ताह निमित्ताने जलदिनाचे आज दि. २१ ला आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जल देवतेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीना शाखा कालवा अध्यक्ष तथा घोड,कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाशराव वायसे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा क्रांती फोंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे हे होते.

या कार्यक्रमास किशोर घोडे सरपंच निमगाव सावा, समिती, अमित कुमावत शाखा अधिकारी शिरोली, जांबुत प्रथमेश पाटील शाखा अधिकारी टाकळी हाजी, कृष्णा चव्हाण राज्य समन्वयक डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, सुरज गुप्ता प्रकल्प व्यवस्थापक, सुभाष अण्णा झिंजाड चेअरमन श्रीकृष्ण पाणी वापर संस्था, पांडुरंग डुकरे, सागर जाधव, नितीन चौधरी, ऋषिकेश बोडके, यावेळी मीना शाखा कालवा वरील सर्व पाणी वापर संस्थेचे चेअरमन संचालक सभासद शेतकरी विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते जलसंपदा विभागातील या विभागाचे अनेक अधिकारी,आयटीसी मिशन,डीएससी संस्थेचे पदाधिकारी,गावचे सरपंच ,परिसरातील पाणी वापर संस्थांचे अनेक पदाधिकारी,स्थानिक ग्रामस्थ,बचत गटांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. यावेळी अनेक वक्त्यांनी आजच्या जल दिना निमित्ताने पाणी व त्याचे महत्व,पाण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी,पाणी वापर संस्था करणे का गरजेचे,इत्यादी माहिती सविस्तर विशद केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कालव्याद्वारे मिळणाऱ्या पाण्याबाबत व इतर ही गोष्टींबाबत अध्यक्ष वायसे यांच्या समोर काही प्रश्न उपस्थत केले. त्यावर वायसे यांनी मी शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्याकामी सातत्याने प्रयत्नशील रहात असून यापुढे ही राहील असे आश्वासन उपस्थित शेतकऱयांना दिले. विशेष करून मीना शाखा कालवा समितीचे सचिव पांडुरंग डुकरे यांच्या कामकाजाबद्दल वायसे यांनी गौरवोदगार काढले.कार्यक्रम छान पार पडला.आलेल्या सर्वांचे स्वागत सागर जाधव यांनी तर आभार डीएसई चे नितीन चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी जल प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.