समाजशील न्यूज नेटवर्क,कात्रज,पुणे : (सा.समाजशील वृत्त सेवा) – ज्ञानप्रसारक ज्युनिअर कॉलेज (एस पी इंटरनॅशनल स्कूल,आंबेगाव) इयत्ता बारावी केंद्र पुणे १ हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असलेल्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शाळेचे संस्थापक अरुण सोकांडे,मंगलाताई सोकांडे, शाळेच्या प्राचार्य पल्लवीताई सोकांडे, संचालक अमर सोकांडे तसेच अध्यक्ष शाळा कमिटी व अध्यक्ष पुणे शहर पोलीस मित्र अनिल रेळेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन व स्वागत केले.
१२ विच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना युवा क्रांती पोलीस मित्र संघटना पुणे टीम कडून तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,वरिष्ठ पत्रकार,प्रदेशाध्यक्ष प्रा.सुभाष अण्णा शेटे,शिवाजीकाका शेलार,श्रीमती वर्षाताई नाईक,राष्ट्रीय युवती उपाध्यक्षा पोलीस मित्र संघटना,डॉ,हेंद्रे,हर्षला मुलाणी व संघटनेच्या सर्व सदस्य,पदाधिकाऱ्यांनी १२ वी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.




