समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे ; (देवकीनंदन शेटे,संपादक) – तालुक्यात सामाजिक हितासाठी निःपक्षपातीपणे काम करणे दिवसेंदिवस अत्यंत कठीण होत चालले आहे. सामाजिक प्रश्न, सर्वसामान्यांचे न्याय्य हक्क आणि जनहितासाठी संघर्ष करताना मानसिक,आर्थिक व शारीरिक त्रास यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी समाजशील शी बोलताना व्यक्त केली आहे.
सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या संघर्षाचे महत्त्व अनेकदा वैयक्तिक आकस, व्यक्तीद्वेष किंवा वैयक्तिक संबंधांमधून निर्माण झालेल्या पूर्वग्रहांमुळे दुर्लक्षित केले जाते. समाजहिताचा प्रश्न असतानाही काहीजण त्याचे मूल्यमापन वैयक्तिक समीकरणांच्या आधारे करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि सामाजिक प्रश्नांना योग्य न्याय मिळावा, यासाठी काम करताना अनेकदा गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, या संघर्षात समाजातील प्रत्येक घटकाची साथ मिळत नसल्याची खंत ही वाळुंज यांनी व्यक्त केली आहे.
“संघर्ष थांबणार नाही कारण भूमिका व्यक्तींसाठी नाही, तर समाजहितासाठी आहे !” असा ठाम निर्धार व्यक्त करत, कितीही त्रास झाला तरी जनहितासाठीची भूमिका कायम ठेवणार असल्याचे निलेश वाळुंज यांनी सांगितले.निवडक असले तरी सामाजिक जाण असलेल्या नागरिकांकडून मिळणारी साथ, विश्वास आणि पाठिंबा हीच पुढील वाटचालीची ताकद असल्याचे सांगत, समाजहिताच्या कार्यात एकजुटीने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.