NEWS
Search

रब्बी हंगामातील पीक विमा योजना सुरू; शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी विमा भरावा – नंदू जाधव

74
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी पीक विमा पोर्टल सुरू झाले असून, यंदाची दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कवठे विभागाचे सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी सा.समाजशील शी बोलताना केले आहे.
रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, कांदा आणि रब्बी ज्वारी या पिकांचा विमा अधिसूचित करण्यात आला आहे. गहू बागायत, ज्वारी बागायत, ज्वारी जिरायत, हरभरा, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा आणि रब्बी मका या पिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे.पीक व क्षेत्रानुसार विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी संबंधित पिकाचा विमा निर्धारित मुदतीत भरावा. रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर २०२६, तर गहू, हरभरा व कांदा पिकांसाठी १५ डिसेंबर २०२६ ही विमा भरण्याची अंतिम मुदत आहे.
यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा व आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी वेळेत विमा नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *