शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाण येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री दत्तगुरुंचा मागील ५० वर्षांपासून अखंडितपणे सुरु असलेला अखंड हरीनाम सप्ताह सोहळा व जयंती उत्सवास आज शुक्रवार दि. ०६ ला सकाळी गावातून भागवत पताका उंचावत,विठू नामाचा गजर करीत ग्रंथराज,कलश,विना,यांचा भाविक,वारकऱ्यांनी टाळ मृदूंगाच्या साथीत व ढाकी वस्ती प्राथमिक शाळेतील बालचमूची आकर्षक नवनाथ वेशभूषा,स्वामी समर्थ,दत्तगुरु,बालकांच्या रूपातील भगव्या पताका उंचावणारे विद्यार्थी,दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले असंख्य नागरिक,महिला,भाविक यांच्या सुमधुर भजनाने भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा संपन्न झाला व खंड हरीनाम सप्ताहास सुरुवात झाली.
यावेळी डॉ.सुभाष पोकळे,राजेंद्र चाटे,बाळासाहेब डांगे,फक्कडराव सांडभोर,अर्जुन मुखेकर, सोपानराव वागदरे महाराज,ग्रंथ,कलश जयवंत भाईक,मृदूंग वादक सुरेश महाराज बो-हाडे,प्रताप पाटील इचके,बबन पोळ,बबुशा कांदळकर पाटील व अनेक भक्तगण या दिंडी सोहळ्यात श्रद्धेने सहभागी झाले होते.
सप्ताह कालावधीत भाविक भक्तांच्या उपस्थितीत वीणाप्रहा र,नियमित हरिपाठ,काकडा भजन करण्यात होणार उपस्थित भाविकांना अन्नदान देखील करण्यात येणार आहे. अखंड हरीनाम सप्ताहचे या वर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत असून दि.१५ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या सप्ताहकाळात रात्री सात ते नऊ कालावधीत कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि. १५ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती अखंड हरीनाम सप्ताह सांगता निमित्ताने सकाळी साडेनऊ ते साडे अकरा या वेळेत ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे,पुणे यांचे काल्याचे कीर्तन,महाप्रसाद व त्यानंतर गावातून दिंडी प्रदक्षिणाने सप्तांहाची सांगता होणार असल्याची माहिती श्री दत्त जयंती सप्ताह व उत्सव समिती कवठे येमाई यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.