नालासोपारा,मुंबई (समाजशील न्यूज नेटवर्क, वृत्तसेवा) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समेळपाडा येथे या महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने मध्यरात्री १२ वाजता शिवसेना महिला शहर प्रमुख रूचिता नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या मौलिक विचारांना या कार्यक्रमास उपस्थित अनेक मान्यवरांनी उजाळा दिला. रिपब्लिकन पक्षाचे विधानसभाध्यक्ष प्रेमसागर इगवे यांच्या वतिने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नालासोपारा शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, रिपब्लिकन नालासोपारा विधानसभा अध्यक्ष प्रेमसागर इगवे तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक नागरीक उपस्थित होते.