शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी, मूलभूत हक्कांसाठी राष्ट्रीय किसान विकास मंच ला साथ द्या – हभप नाना महाराज कापडणीस,राष्ट्रीय अध्यक्ष यांचे आवाहन 

250
मालेगाव,नाशिक (सा.समाजशील वृत्तसेवा) – जी सामाजिक संघटना किंवा जो  राजकीय पक्ष शेतक-यांच्या हितासाठी काम करित आहोत असे दाखवून  जर शेतकऱ्यांच्या च मुळावर उठले असतील तर अशा सामाजिक संघटनांमधून किंवा राजकीय पक्षांमधून शेतक-यांनी राजीनामे देवून बाहेर पडावे व कुठल्याही सामाजिक संघटनेचा किंवा राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता आपल्या न्याय मागण्या व मूलभूत हक्कांसाठी  विविध विभागात नाहक प्रलंबित राहत असलेले शेतीविषयी महत्वाचे प्रश्न व त्यामुळे अशा शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट व मानसिक ताण होत असल्याने  शेती विषयकअनेक प्रश्नांची एकजुटीने व सहकार्यातून जलदगतीने सोडवणूक होण्याकामी भारत सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच मध्ये सहभागी होत संघटनेला साथ देवून आपल्या हक्कासाठी स्वत:रस्त्यावर उतरावे लागले तरी तयारी ठेवावी लागेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रीय किसान विकास मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष हभप नाना महाराज कापडणीस यांनी दिला आहे.
     सरकारच्या विरोधात नाही तर सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेसाठी किंवा शेतक-यांसाठी आखलेल्या चुकीच्या धोरणांविषयी सरकारशी लढा देण्याकरीता सर्व शेतक-यांनी एक व्हावे,एकत्र व्हावे,एका झेंड्याखाली यावे.तरच काही प्रमाणात का होईना शेतक-यांना न्याय मिळेल अन्यथा शेतकरी रोज न्यायाची प्रतीक्षा करीत राहील व रोज आत्महत्या करीत राहील असे ही कापडणिस महाराज म्हणाले.
         तर मंच चे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पत्रकार,प्रा.सुभाष अण्णा शेटे यांनी शेतक-यांनो जागे व्हा आता आपण आत्महत्या करायची नाही तर आपल्या न्याय मागण्या व हक्कासाठी साठी सरकारकडे पाठपुरावा,लढा देण्याचे कार्य आपल्याला करायचे असल्याचे सांगितले. तेव्हा राज्यातील विविध भागातील अधिकाधिक समाजसेवी,शेतकरी भावांनी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच मध्ये सहभागी होण्याचे आवाहन हभप नाना महाराज कापडणीस,राष्ट्रीय अध्यक्ष व मंच च्या पद!धिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds