समाजशील न्यूज नेटवर्क,दहिसर,मुंबई : (प्रा सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – युवा क्रांती पोलीस मित्र संघटने अंतर्गत ग्राहक संरक्षण, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या माध्यमातून दहिसर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई महानगरात संघटनेच्या वतीने प्रथमच श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे नियोजन दहिसर तालुका कार्याध्यक्ष प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच महाराजांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असा संदेश यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दिला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा करणारी पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राकेश वाघ उपस्थित होते. तसेच मुंबई अध्यक्ष राज चौधरी, महिला मुंबई अध्यक्षा स्मिताताई बांदेकर, युवा मुंबई अध्यक्ष धनेश रामलखानी, युवा मुंबई सचिव कुणाल शहा, मुंबई महिला संघटक श्रुनल नांगरे, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्षा वनिताताई तोंडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व लोककल्याणकारी विचारांचे स्मरण करत संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात संघटनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, सदस्य तसेच अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन संघटनेच्या माध्यमातून प्रामाणिक समाजसेवेची शपथ घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Home dahisar मुंबईत दहिसर तालुक्यात युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

मुंबईत दहिसर तालुक्यात युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
BySamajsheel NewsMarch 7, 20260
