पुणे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप आराखड्यानूसार शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ७ गट, पंचायत समितीचे १४ गण सन २०११ च्या जनगणनेनुसार तयार केले आहेत. शिरूर तालुक्यात कवठे येमाई, न्हावरे, रांजणगाव गणपती,पाबळ, सणसवाडी, शिक्रापूर तसेच मांडवगण फराटा असे ७ जिल्हा परिषदेचे गट तयार करण्यात आले आहेत. नवीन आराखड्यानूसार तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट विसर्जित करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे गावाचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. गट तर विसर्जित केलाच परंतु गावातील एक प्रभाग सणसवाडी गटाला जोडला असून उर्वरित दोन ते सहा प्रभाग शिक्रापूर गटाला जोडले आहेत. शिक्रापूर गटामध्ये शिक्रापूर, कासारी, निमगाव म्हाळुंगी, तळेगाव ढमढेरे,पारोडी,दहिवडी,करंजावणे, भांबर्डे, उरळगाव, टाकळीभीमा ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. सणसवाडी गटात कोरेगाव भीमा,वाडा पुनर्वसन,आपटी, वढू बुद्रुक,डिंग्रजवाडी,वाजेवाडी, सणसवाडी,धानोरे,दरेकरवाडी, विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. तळेगाव ढमढेरे गावात एकूण ६ प्रभाग आहेत.त्यापैकी प्रभाग क्रमांक १ सणसवाडी जिल्हा परिषद गटाला जोडला आहे तर प्रभाग क्रमांक २ ते ६ शिक्रापूर गटाला जोडले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणावर झालेल्या सभेत बोलताना शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष , तळेगाव ढमढेरे येथील श्री.राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी सांगितले, मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मिटींगमध्ये गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. कायदेतज्ज्ञही उपस्थित होते.न्यायालयीन लढाईसाठी आम्ही आमची ताकद लावू असे कायदेतज्ज्ञांनी सांगितले आहे.राजकीय मंडळींनीही सांगितले आहे, आम्ही आमची राजकीय ताकद लावून प्रशांसनापर्यंत आपल्या भावना पोहचवू.काही मंडळींनी आर्थिक दृष्ट्या सहकार्य करण्याची भावना दाखवली आहे. इतर राजकीय पदाधिका-यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ग्रामसभेस ग्रामपंचायत पदाधिका-यांसह , राजकीय पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home शिक्रापूर प्रशासनाने दखल घेतली नाही तर प्राणांतिक, आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत ; राजेंद्र ढमढेरे पाटील यांचा इशारा

प्रशासनाने दखल घेतली नाही तर प्राणांतिक, आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत ; राजेंद्र ढमढेरे पाटील यांचा इशारा
BySamajsheelJuly 20, 20250
समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही प्राणांतिक, आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत आमरण, उपोषण आम्ही दोन -चार दिवसांत चालू करू असा इशारा शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष राजेंद्र गोविंदराव ढमढेरे पाटील यांनी तळेगाव ढमढेरे येथे दिला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रारूप आराखडा नुकताच जाहीर झाला असून सदर आराखड्यामध्ये तळेगाव ढमढेरे गावची दोन जिल्हा परिषद गटात विभागणी झाल्याने या विषयासंदर्भात आज शुक्रवार दि.१८ जुलै २०२५ रोजी अत्यावश्यक सेवा वगळता तळेगाव ढमढेरे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजार मैदानाजवळील श्री.हनुमान मंदीर ते ग्रामपंचायत कार्यालय असा जाहीर निषेध मोर्चाही काढण्यात आला होता. ग्रामस्थ व राजकीय पदाधिका-यांनी निषेध मोर्चात तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट झालाच पाहिजे, माझा गाव माझा अभिमान असे फलक हातात घेवून छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट झालाच पाहिजे, तळेगावचे दोन तुकडे करणा-या प्रशासनाचा निषेध असो,जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा निषेध मोर्चात देण्यात आल्या.
Previous Postस्वस्त धान्य दुकानातील POS मशीनची सेवा वारंवार बंद - दुकानदार,शिधापत्रिका धारक वैतागले
Next Postशिक्रापूर शाळेतील १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ; सुयश उगले राज्य गुणवत्ता यादीत ९ वा