शिक्रापूर शाळेतील १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ; सुयश उगले राज्य गुणवत्ता यादीत ९ वा

समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. या शाळेतील २०विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेची शिष्यवृत्तीची उज्ज्वल परंपरा अबाधित ठेवली. शाळेतील सोहम जुनघरे या विद्यार्थ्याची नवोदय परीक्षेत निवड झाली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.साधना शिंदे मॅडम यांनी दिली.
पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर येथील गुणवत्ताधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे- सुयश उगले ,आशुकुमार कटियार ,यश पवार, हर्षवर्धन कर्हे ,आईशा आलमेल ,प्रद्युम धुप्पे, सोहम जुनघरे, अक्षदा गायकवाड ,रुद्र वीर राठोड, सेजल लवांडे ,आर्य शिंदे ,राज पवार ,श्रेयस अडसूळ, निशा कांबळे ,शहाबाज तांबोळी, कृष्णा जाधव, संस्कृती पांढरे, तनुष्का पाटील ,ज्ञानेश्वरी जगताप.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सौ.  मधुमालिनी गोडसे, सौ. रजनी भिवरे ,सौ .सुशीला तांबे, सौ .संजया मांडगे, श्री मंगेश येवले आणि सौ सारिका गुंजाळ या वर्गशिक्षकांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सनी जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत मांढरे व सर्व सदस्य शिक्रापूरचे सरपंच श्री रमेश गडदे, उपसरपंच वंदनाताई भुजबळ व सर्व सदस्य, माजी उपसरपंच सुभाष खैरे ,शिक्षण तज्ञ नवनाथ भाऊ सासवडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.साधना शिंदे, केंद्रप्रमुख श्री प्रकाश लंघे , विस्ताराधिकारी वंदना शिंदे मॅडम व मुकुंद देंडगे साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. बाळकृष्ण कळमकर साहेब, शिक्षणाधिकारी श्री .संजय नाईकडे साहेब यांनी अभिनंदन केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds