समाजशील न्यूज नेटवर्क,निफाड,नाशिक (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करण्याची मनापासून आवड व सवड असली की,त्या व्यक्तीकडून नक्कीच समाजहिताची व कौतुकास्पद कार्य लीलया पार पडत असतात. असेच एका उदाहरण म्हणजे सय्यद अली शेर अली शेख हे होत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोळगाव खेडले गावाचे असलेले व युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेत निफाड तालुका संपर्क प्रमुख कार्यरत असतानाच त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दाखल संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी घेत नुकतीच त्यांची उत्तर महाराष्ट्र युवा संघटक म्हणून नियुक्ती केली आहे.



याच संधीचे सोने करायचेच ठरवत सय्यद भाई यांनी उत्तर महाराष्ट्रात युवकांमध्ये संघटन वाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.आज बुधवार दि. १२ फेब्रुवारीस त्यांच्या निफाड तालुक्यातील कोळगाव खेडले गावाच्या खंडेरायाची यात्रा आणि याच निमित्ताने त्यांनी त्यांचे सहकारी मित्र स्व.अमोल दादा फाउंडेशनची स्थापना पूर्वीच केली असल्याने त्या अंतर्गत रक्तदान शिबीराचे आयोजन करीत इतरांपुढे एक विधायक व स्तुत्य आदर्श ठेवण्याचे काम केले आहे.या शिबीरात ४३ जणांनी रक्तदान करीत सय्यदभाईंच्या या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला. कोळगाव खोडले गावाला ऐतिहासिक महत्व असून गावात संत तुकाराम महाराजांचा आश्रम व महत्वाचे म्हणजे रामभक्त हनुमानाची १११ फूट उंचीची श्रध्येय मूर्ती आहे. आणि या व इतर बाबी गावाच्या वैभवात भर घालण्याचे काम करत आहेत. सय्यदभाई खंडेरायाच्या यात्रेत सक्रिय सहभागी होत असून सामाजिक क्षेत्रात गरजवंतांना भरभरून मदतीचा हात देण्याचे प्रसंगी सुख दुःखात साहिभागी होण्याचे कार्य विनम्रपणे करीत आहेत.
सय्यद भाई यांनी खंडेराया यात्रे निमित्ताने राबविलेल्या रक्तदान शिबीर उपक्रमाचे संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्षा अध्यक्षा जयश्री ताई अहिरे,राष्ट्रीय तक्रार समितीचे अध्यक्ष हभप मोतीलालजी नाना महाराज कापडणीस, सरचिटणीस अमृत ताई पठारे,राष्ट्रीय संपर्क प्रमुख डॉ.राजेंद्र हेंद्रे,राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार,राष्ट्रीय सल्लागार भाऊसाहेब शेळके,राष्ट्रीय सल्लागार नानासाहेब बढे पाटील, राष्ट्रीय मार्गदर्शक आनंदराव पगार,राष्ट्रीय मार्गदर्शक,ह. भ. प.अवचितानंद महाराज, महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक वर्षाताई नाईक,धुळ्याच्या महिला प्रमुख शबाना शेख,निफाड तालुका अध्यक्ष संतोष जमदाडे,नितीन कुंदे,भरत रहाणे व सहकारी,स्थानिक ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.