समाजशील न्यूज नेटवर्क,धनकवडी, पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : पोलिस मित्र संघाची समन्वय बैठक धनकवडी येथील श्री विजयसा कोल्हापुरे यांच्या श्री दशभुजा भवानी माता मंदिरात उत्साहात संपन्न झाली. समाजातील वंचित, गोरगरीब व गरजू नागरिकांना मदत करण्यासह राज्यातील गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर संघटनेचा विस्तार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
बैठकीला संस्थापक अध्यक्ष श्री. श्याम घाडगे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पत्रकार श्री. सुभाष शेटे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती वर्षाताई नाईक, पुणे शहर अध्यक्ष श्रीमती अल्पना गोटे आणि पुणे शहर संघटक श्री. सुनील पवार उपस्थित होते.
राष्ट्रीय महिला अध्यक्ष वर्षाताई नाईक यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसेवा करत राज्यभर संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. तर पुणे शहर अध्यक्ष अल्पना गोटे यांनी पुणे शहरासह मुळशी तालुक्यात संघटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.अध्यक्ष श्याम घाडगे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून संघटनेचे कार्य प्रभावीपणे वाढविण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. आभार प्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली.
Home पुणे पोलिस मित्र संघाची समन्वय बैठक पुण्यात संपन्न! – सामाजिक कार्य आणि संघटन वाढीसाठी पदाधिकाऱ्यांचा निर्धार

पोलिस मित्र संघाची समन्वय बैठक पुण्यात संपन्न! – सामाजिक कार्य आणि संघटन वाढीसाठी पदाधिकाऱ्यांचा निर्धार
BySamajsheel NewsOctober 22, 20260
