मुरबाड,ठाणे : मुरबाड ची प्रिंयका बोरगे उच्च शिक्षणासाठी रशियाला रवाना, मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

639
          मुरबाड,ठाणे : मुरबाड तालुक्यातील पत्रकार संजय रमाकांत बोरगे यांची कन्या प्रियंका बोरगे ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी रशिया येथे रवाना झाली आहे. रशिया येथील एक नामांकित अल्ताई विद्यापीठात सहा वर्षे शिक्षण घेणार आहे.
अभ्यासात अतिशय हुशार असणारी प्रियंका ही इयत्ता चौथी नंतर शिष्यवृत्ती परीक्षेत पास होऊन पालघर येथील जवाहर नवोदय विद्यालयात दाखल झाली होती. त्यानंतर आपल्या अभ्यासू वृत्तीची इयत्ता दहावी आणि बारावी विज्ञान शाखेत ९६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. विशेष म्हणजे सीबीएससी या केंद्रीय बोर्डातून तिने परीक्षा दिली होती.
          बारावी परीक्षा पास झाल्यानंतर डॉक्टर होऊन येथील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची इच्छा असल्याने पत्रकार असलेले वडील संजय बोरगे यांनी यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. रशिया देशातील अल्ताई विद्यापीठात जनरल मेडिसिन या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रियंका हिचा क्रमांक लागला. बोरगे यांच्या प्रयत्नांना पाहिले यश प्राप्त झाले आणि त्यांचा पुढील संघर्ष सुरू झाला.
         मुरबाड औदयोगिक क्षेत्रात एका कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पत्रकार बोरगे यांची घरची आर्थिक स्थिती बिकट आहे. मात्र मुलीची अभ्यासातील जिद्द आणि प्रयत्न यावर पूर्ण विश्वास असल्याने बोरगे यांनीही अनेक आर्थिक अडचणींवर मात करून, काही मान्यवर व्यक्तींकडून आणि बँकेचे सहाय्य घेऊन प्रियंकाच्या रशिया येथील मार्ग सुकर केला.  प्रियंका ही रशिया येथील पुढील शिक्षणासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाली.
प्रियंका हिला रशियाला रवाना होण्यापूर्वी मुरबाड तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भेट घेऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. ग्रामिण भागातील पत्रकाराची परिस्थिति हालाकीची असताना त्यावर मात करुण प्रियंकाचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी पत्रकार वर्ग व सा.समाजशील व न्यूजच्या वतीने तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *