समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून शैलेश वडनेरे आणि मनसेच्या संगिता चेंदवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मुरबाड विधानसभेसाठी आतापर्यंत आठ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता यापैकी किती उमेदवार माघारी घेतात हेही पहावे लागणार आहे. सुरेश बबन जमदरे (अपक्ष) , किसन शंकर कथोरे (महायुती- भाजप), शरद लक्ष्मण भुंडेरे पाटिल (अपक्ष), सागर जयराम अहिरे ( निर्भया पक्ष), सुभाष गोटीराम पवार (महाविकास आघाडी- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) , प्राजक्ता निलेश येलवे (बहुजन मुक्ती पार्टी), संगिता चेंदवणकर (मनसे) व शैलेश केसरीनाथ वडनेर (अपक्ष) यांनी आतापर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी कोण माघार घेणार यानुसार विधानसभेतील निवडणुकीची रंगत ठरणार आहे.
आज मनसेच्या संगिता चेंदवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून. उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांनी ही माऊली गार्डन येथून भव्य रॅली व शक्ति प्रदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जनतेशी संवाद साधला.
वडनेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज भरून शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पक्षावर टीका करत पक्ष निष्ठावंतांना डावलून संधी आयात उमेदवारांना देते त्यामुळें मी मुरबाड व बदलापूर च्या विकासासाठी व सामान्य जनतेला प्रश्न सोडविण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीला किती नुकसान वडनेरे यांच्या उमेदवारी मुळे सहन करावे लागणार हे मतदार च ठरवतील मात्र मी महायुती व महाविकास आघाडीला आव्हान देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.