वरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा  शेटे यांची यांची युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय मीडिया प्रमुख मार्गदर्शकपदी निवड  

91
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.देवकीनंदन शेटे,संपादक) – मागील २० वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे विविध प्रश्न लीलया सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे मूळ कवठे येमाई ता. शिरूर जि पुणे येथील वरीष्ठ पत्रकार प्रा सुभाष अण्णा शेटे यांची युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र गाहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय मिडिया प्रमुख मार्गदर्शक पदावर फेर नियुक्ती फेरनियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. रविंद्रजी सूर्यवंशी यांनी प्रा.सुभाष शेटे यांना निवडी बाबतचे पत्र आज दि. ११ ला दिले.युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात लढणारे प्रभावी युनिट म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार तसेच राष्ट्रीय किसान विकास मंच या व्यासपीठ मार्फत गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा दिला जात आहे.
संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. रविंद्रजी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळ, राष्ट्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने संघटनेसाठी मनापासून सेवाभावी कार्य करणारे वरिष्ठ पत्रकार प्रा सुभाष अण्णा शेटे यांना पुन्हा एक वर्षासाठी त्यांच्या पूर्वीच्या पदावर फेरनियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक रविंद्र सूर्यवंशी यांनी आज ११ मार्च २०२६ त्यांची पुढील एक वर्षासाठी फेर नियुक्ती केली आहे या निर्णयामुळे संघटनेचे सर्वच सदस्य पदाधिकारी यांनी प्रा पत्रकार सुभाष अण्णा शेटे यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या नियुक्तीने युवा क्रांती संघटनेचे कार्य अधिक बळकट होणार असून भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी तसेच भ्रष्ट अधिकारी वर्गाच्या मुसक्या आवळण्यासाठी संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास संघटनेतील सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर युवा क्रांती फाउंडेशन हे व्यासपीठ समाजातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने कार्यरत राहील, अशी भावना संस्थापक अध्यक्ष मा. रविंद्रजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *