NEWS
Search

धनकवडी पुणे  येथे ७० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान : जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस तपास साप्ताहिक व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा उपक्रम

33

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. विजय कोल्हापुरे यांच्या दशमुखी भवानी माता मंदिराजवळील सभागृहात झालेल्या समारंभात विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या ७० कर्तृत्ववान महिलांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. हा उपक्रम पोलीस तपास साप्ताहिक वृत्तपत्र व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनकवडी,पुणे येथील वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वर्षाताई नाईक या होत्या. तर प्रमुख मान्यवर म्हणून सेवानिवृत्त पीएसआय विठ्ठलराव माने, समाजशील न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पुणे शहराध्यक्ष व क्राईम रिपोर्टर श्री.चेतन शर्मा, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्तात्रेय जरंडे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते उपस्थित ७० महिलांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धनकवडी येथील विजय कोल्हापुरे यांच्या दशमुखी भवानी माता मंदिरातील भवानी मातेची विधिवत आरती करण्यात आली.समाजसेवा, महिला सक्षमीकरण व विविध सामाजिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान झाल्यामुळे उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाचे वातावरण दिसून आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती वर्षाताई नाईक यांच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना गुलाबपुष्प व चहापान देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *