विकासकामे करण्याची क्षमता फक्त वळसे पाटील यांच्याकडेच – त्यामुळे असलेली ही संधी दवडू नका  – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील  

108
समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर आंबेगावचे लोकप्रिय आमदार ना.दिलीपराव वळसे पाटील यांचेकडेच विकासकामे करण्याची क्षमता आहे. त्यामुळे असलेली ही संधी दवडू नका,आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना बहुमताने विधानसभेत पाठवा असे आवाहन शिरूर लोकसभेचे लोकप्रिय  माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. ते शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथे ना.वळसे पाटील साहेबांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार ना.दिलीपराव वळसे पाटील,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,किरणताई वळसे पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे,जयश्री ताई पलांडे,मानसिंग पाचुंदकर पाटील,प्रदीपदादा वळसे पाटील,विवेक वळसे पाटील महायुतीतील घटक पक्षांचे महिला,पुरुष पदाधिकारी, व समोरच्या प्रांगणात वळसे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आलेल्या हजारो महिलांचा अथांग जनसागर उपस्थित होता.
यावेळी बोलताना माजी खासदार तथा म्हाडाचे अध्यक्ष आढळराव पाटील म्हणाले कि,महागणपती रांजणगावच्या या पवित्र पुणे भूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नारीशक्तीचा महापूर या ठिकाणी आलेला दिसतोय. खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण महिला गेले तास-दीड तासापासून उपस्थित आहात. येताना मी पाहिलं रस्त्यावर अजूनही महिला आहेत काही महागणपतीच्या दर्शनाच्या रांगेला आहेत,अजूनही काही महिला येत आहेत.  इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात याचे संकेत म्हणजे आदरणीय वळसे पाटील खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येणार याच्याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही. आपल्या सगळ्यांना माहिती गेल्या ३५ वर्षे वळसे पाटील विधानसभेत यशस्वी प्रतिनिधीत्व करीत आहेत. सुरुवातीला आंबेगाव जुन्नर विधानसभा मतदारसंघ त्याच्यानंतर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ ३५ वर्ष राजकारणामध्ये काम करून एक अतिशय निष्कलंक मनमिळावू आणि विकास कामाचे कास धरणार नेतृत्व या परिसराला या जिल्ह्याला लाभले ते म्हणजे आदरणीय वळसे पाटील हे होत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या पहिल्या तीन निवडणुका मी स्वतः हँडल केल्या. १९९० ला ते उभे होते त्या वेळेला मी सगळ्या प्रचाराची धुरा माझ्याकडे होती. ९५ ला सुद्धा मी त्यांचा प्रचाराचा काम पाहिलं. १९९९ ला सुद्धा मीच प्रचारामध्ये त्यांचा प्रचार प्रमुख होतो.  या तिन्ही निवडणूक मध्ये काम करताना मी पाहिलं त्यावेळी आंबेगाव तालुक्याची परिस्थिती काय होती एक अतिशय दुष्काळी तालुका आणि त्या तालुक्याचा विकास करण्यासाठी निवडून आल्यानंतर वळसे पाटलांना मी स्वतः जातीने पाहिलं की विकास कसा करायचा ?विकासाची  काकास कशी धरायची ? त्यासाठी प्रयत्न काय करायचे ? मंत्रालयामध्ये असो किंवा सरकारमध्ये वळसे पाटील यांची चिकाटी कशी असते हे मी स्वतः जातीने पाहिलं आणि म्हणून मी बघितलं ३५ वर्षे लोकांची पसंती कायम वळसे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे का उभे राहिलेली आहे.  आता तर  राजकारणबद्दल कोणी उठत,मला आमदार व्हायचं ते गाणं जस आहे त्याप्रमाणे आता त्यांना आमदार झाल्यासारखं वाटतंय ,पण मित्रहो हा नुसता बुडबुडा आहे, ही नुसती धूळफेक आहे.  नुसत्या निष्ठा आणि स्वाभिमान याच्या गप्पा मारून कोणी निवडणुकीला जिंकू शकत नाही.  पण आज काय झाले काल मंचरला बघितल मी जी सभा होती त्या सभेमध्ये बऱ्याचशा लोकांची भाषण कोणी ज्याची लायकी नाही त्यांनी वळसे पाटलांना टीका करायची आणि आपल्या समोरचा उमेदवार मुरारी लाव रे तो व्हिडिओ माझं तर म्हणणं असं आहे तू घरी जाऊन तुला काय व्हिडिओ लावायचे तू बघ तू आणि नवरा बायको घरामध्ये.
            वळसे पाटील यांनी सुरुवातीपासून त्या माणसाला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. काही नसताना त्याला हाताला बोट धरून आणलं प्रत्येक ठिकाणी संधी दिली.  मार्केट कमिटी असो कारखाना असो इकडे असो तिकडे प्रत्येक ठिकाणी साहेब संधी देत आले. त्याला वाटायला लागलं आपण जे मागू ते सगळे आमदार साहेब देत आहेत आता आपण आमदार पण होऊ. पण या तालुक्यातील, परिसरातील जनता एवढी वेडी नाही.  मी वीस वर्ष विरोधात होतो पंधरा वर्षे आम्ही दोघांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. भीमाशंकर  कारखाना उभारणीसाठी. मी स्वतः चेअरमन होतो पहिला.  चेअरमन मी आहे आम्ही दोघांनी कष्ट केल्याने कारखाना उभा केला पण कधी अशी वाकडी नजर राजकारणामध्ये लावलेली नाही.  आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आपल्याला विनंती करायची विकास काम करण्याची क्षमता ही फक्त वळसे पाटलांच्या मध्येच आहे मी अभिमानाने सांगत असतो सरकारने त्यांच्यावर जबाबदारी टाकली उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री खाते कुणाला त्याचा उच्चारही करता येणार  नाही  पण त्यात किचकट खात्याच्या कारभार हातात घेतल्यानंतर अल्पावधीमध्ये सगळ्यात मोठं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज हे आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी उभं केलं.  हजारो तरुणी तिथून शिक्षण घेतात हजारो तरुण तिथून शिक्षण घेतात कोण विदेशात आहेत,कोण सरकारी नोकरीमध्ये आहेत,कोणी आयटी कंपन्यांमध्ये आहेत, मोठ्या पदावर काम करतात याचे एकमेव कारण २५ वर्षांमध्ये कुठेही इंजिनिअरिंग कॉलेज झालं नाही गव्हर्मेंटच ते फक्त वळसे पाटलांच्या मतदारसंघांमध्ये त्यांनी करून दाखवलं हे त्यांचे काम आहे आणि ते  फक्त त्यांना जमते.  गृहमंत्री पदाच्या  दोन वर्षा त तुम्ही पाहिलं परिसरामध्ये ल्या पोलीस स्टेशनच्या इमारती पुलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहती आणि चांगल्या प्रकारचे काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिले आणि म्हणून मी सांगतो समोरच्याला काय जास्त बोलायचं नाही मला फक्त एवढीच विनंती करायची ही वेळ दवडू नका ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे.  त्यांनी येणाऱ्या पाच वर्षांमध्ये एकच संकल्प सोडलाय तो म्हणजे आंबेगाव आणि शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतीचे पाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो बाकी सगळं सोडून द्या ह्या वेळेला फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांना गरज आहे वळसे पाटलांची त्यांच्या नेतृत्वाची म्हणून येणाऱ्या २० तारखेला घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds