समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभेत महायुती व महाविकास आघाडीतील उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारार्थ आर पी आय (आ) गटाने शक्ति प्रदर्शन करत महायुतीत आर पी आय (आ) गटाचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे यांनी आपल्या पक्षाचे योगदान किती आहे हे दाखवून दिले. शक्ति प्रदर्शन करताना मुरबाड कुणबी समाज सभागृहात पक्षाचा मेळावा घेऊन आपण किसन कथोरे यांना विजयी करण्यासाठी तत्पर असल्याचं दाखवून दिले. यावेळी महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांनी मुरबाड मतदार संघाचा आमदार होण्यापूर्वी मुरबाड ची परिस्थिती दयनीय होती, मुरबाड चा विकास कुठून करायचा ? असा प्रश्न पडला होता. मुरबाड मतदार संघाची धुरा सांभाळल्या नंतर. मुरबाड मधील दलीत वस्ती मधील कामांना प्राधान्य दिले . मी कधीही दूजाभाव केला नसुन मुरबाड मतदार संघात पूर्वी दहशतीचे राजकारण होतें मात्र आता सर्व ठिक आहे. आपल्या पाठींब्या मुळे आपला विजय निच्छित असल्याची खात्री यावेळी किसन कथोरे यांनी दिली.