कवठे येमाई दि.०९ (प्रतिनिधी) – शिरूर शहरात अंमली पदार्थांची अवैध विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मार्केट यार्डच्या मागील बाजूस असलेल्या साईनगर परिसरात छापा टाकून गांजा विक्रीप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी आशुतोष मिलिंद काळे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री पावणे कराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये उत्कर्ष जालिंदर ढेरे (वय २१, रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरूर) आणि साई संतोष ससाणे (वय २०, रा. हुडको कॉलनी, शिरूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी केलेल्या तपासात मुख्य आरोपी आशुतोष काळे याने स्वतःच्या राहत्या घरात गांजा साठवून ठेवला होता. त्यापैकी काही गांजा विक्रीसाठी उत्कर्ष ढेरे व साई ससाणे यांच्याकडे दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घराची व संबंधित ठिकाणांची तपासणी करून मोठ्या प्रमाणात गांजा आणि इतर साहित्य जप्त केले.या कारवाईत आशुतोष काळे याच्या घरातून १ किलो ८०९ ग्रॅम, उत्कर्ष ढेरे याच्याकडून १२२ ग्रॅम, साई ससाणे याच्याकडून ८० ग्रॅम, तर अॅक्टिव्हा मोटारसायकलच्या डिक्कीतून ४०३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय दोन आयफोन, एक वनप्लस मोबाईल, गांजा पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ९९ रिकाम्या प्लास्टिक पिशव्या आणि वजनकाटा हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत एकूण २ किलो ४१४ ग्रॅम गांजासह सुमारे २ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून फरार मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.ही कारवाई शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले व त्यांच्या पथकाने केली. पोलीस कॉन्स्टेबल ए. एस. माने यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टेंगले करीत आहेत.अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व तस्करीला आळा घालण्यासाठी शिरूर पोलिसांनी उचललेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशा अवैध धंद्यांबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी,असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६
Home बातम्या पुणे शिरूर पोलिसांची अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई! गांजा विक्रीप्रकरणी दोघांना अटक; मुख्य आरोपी आशुतोष काळे फरार;२ किलो ४१४ ग्रॅम गांजासह २ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिरूर पोलिसांची अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई! गांजा विक्रीप्रकरणी दोघांना अटक; मुख्य आरोपी आशुतोष काळे फरार;२ किलो ४१४ ग्रॅम गांजासह २ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
BySamajsheel NewsNovember 9, 20260
Previous Postपुणे-अहिल्यानगर महामार्गालगत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला,शिरूर पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद; मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन
Next Postथकीत पाणीपट्टी,घरपट्टी तात्काळ भरा : ग्रामविकास अधिकारी पूनम थोरात चितळकर यांचे आवाहन
