कवठे येमाई दि. १३ (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे ग्रामपंचायतीस नागरिकांकडून देय असलेली सन २०२५/२६/२७ साठीची करवसुली मोहीम सुरु करण्यात आली असून ग्रामस्थांनी ही ग्रामपंचायतीस देय असलेली घरपट्टी,पाणीपट्टी व इतर कर तात्काळ भरून सहकार्य करण्याचे आवाहन शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके,विस्तार अधिकारी बी.आर.गावडे,ग्रामविकास अधिकारी पूनम थोरात चितळकर यांनी केले आहे.

दर वर्षी प्रमाणे आज जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे यांना ग्रामपंचायतीस देय असलेले कर त्यांचेकडून आज बुधवार दि.०४ रोजी प्रथम भरून घेत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली.ग्रामपंचायत कर्मचारी,बबनराव शिंदे,विकास उघडे यांनी ग्रामपंचायतीतील आपापली कामे सांभाळून ग्रामपंचायतीस जास्तीत जास्त करवसुली होण्याकामी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी दिलेल्या करातूनच आरोग्य,दिवाबत्ती,स्वच्छ ता,पाणीपुरवठा,कर्मचारी व इतर विकासात्मक कामांवर खर्च होत असल्याने व नागरिकांनी ग्रामपंचायतीस दिलेल्या करातूनच अनेक स्थानिक कामे होत असतात त्यामुळे ग्रामपंचायतीस देय असलेले सन २०२५/२६/२७ साठीचे कर तात्काळ भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी पूनम थोरात यांनी केले आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अष्टविनायक महामार्गावर असलेली एक मोठी ग्रामपंचायत असलेल्या कवठे येमाई येथे आज ग्रामपंचायतीत करवसुली संदर्भात ग्रामविकास अधिकारी पूनम थोरात चितळकर यांना विचारले असता सध्या दुष्काळाची प्रचंड दाहकता जाणवू लागली असली तरी ग्रामस्थानी आपल्या मालमत्तांचा ग्रामपंचायतीस देय असलेला कर,घरपट्टी,पाणी पट्टी भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. थकीत व चालू घरपट्टी ,पाणीपट्टी,नळपट्टी कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठोस व प्रभावी उपाय योजना राबविण्यास मागील दोन दिवसांपपासून सुरु केली असून ग्रामपंचायतीचे सर्वच कर्मचारी कर संकलनाचे कार्य करीत आहे,अजित शिंदे,अमोल पंचरास,बबन नाना शिंदे,विकास उघडे,प्रतिमा काळे हे सर्वच थेट ग्रामपंचायतीस देय असलेल्या कर दात्यांच्या घरी जाऊन चालू व थकबाकीदार ग्रामस्थांना कर भरण्याचे नम्र आवाहन करीत आहेत.प्राप्त माहिती नुसार गाव व गावठाणातील अनेक मान्यवर ग्रामस्थांकडे पाणीपट्टी,घरपट्टी अनेक वर्षांपासून थकीत आहे.अशा थक बाकीदारांनी दिरंगाई,टाळाटाळ न करता आपापली ग्रामपंचायतीस देय असलेली पाणीपट्टी,घरपट्टी तात्काळ भरण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.आपणास ग्रामपंचायतीस देय असलेल्या करातूनच गावातील विविध विकास कामे,पाणी पुरवठा,आरोग्य सुविधा,ग्राम स्वच्छता ही सामाजिक कार्ये मार्गी लागत असतात. लवकरच दिवाळी उत्सव सुरु होईल त्यापूर्वीच ग्रामस्थानी आपण आपली जबाबदारी ओळखून ग्रामपंचायतीस देय असलेली कररुपी चालू व थकबाकीची कर रुपी रक्कम भरून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासक तथा शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी.आर.गावडे यांनी केले आहे.
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६

